Eco friendly bappa Competition
घर देश-विदेश New Rules 2023 : 'या' नियमांत बदल, सर्वसामान्यांच्या खिशावर होणार परिणाम

New Rules 2023 : ‘या’ नियमांत बदल, सर्वसामान्यांच्या खिशावर होणार परिणाम

Subscribe

नवी दिल्ली : जून महिन्याच्या सुरुवातीलाच अनेक बदल (New Rules 2023) करण्यात आल्यामुळे त्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होणार आहे. तेल कंपन्यांनी आजपासून दर कमी केल्यामुळे एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीसह पीएनजी (PNG) आणि सीएलजीच्या (CNG) किमतीतही बदल करण्यात आला आहे.

स्वत: झाले गॅस सिलिंडर
तेल कंपन्यांनी दरात कपात केल्यामुळे आता मुंबई, नवी दिल्ली आणि कोतकातामध्ये 19 किलाचा व्यावसायिक गॅस सिलेंडर 83.50 रुपयांनी स्वत: झाला आहे. त्यामुळे आता 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरसाठी मुंबईत 1773 रुपये, नवी दिल्लीत 1773 रुपये आणि कोलकातामध्ये 1875.50 रुपये मोजावे लागणार आहेत. याशिवाय पीएनजी (PNG) आणि सीएनजीच्या (CNG) किमतीतही बदल करण्यात आला आहे. मात्र गेल्या दोन महिन्यांत घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

- Advertisement -

आरबीआयची विशेष मोहीम
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) अनक्लेम्ड रक्कम परत करण्यासाठी 100 दिवस 100 पेमेंट मोहीमला सुरूवात केली आहे. याद्वारे आरबीआयने बँकांना प्रत्येक जिल्ह्याच्या बँकेतील किमान 100 अनक्लेम्ड डिपॉजिट ठेवी ग्राहकांना 100 दिवसांच्या आत परत करण्याचे निर्देश दिले आहेत. याद्वारे आरबीआय इनऍक्टिव आणि अनक्लेम्ड रकमेची संख्या कमी करण्याचा प्रयत्न करत आहे.

टू व्हीलर महागणार
आजपासून टू व्हीलर वाहने महागणार असल्यामुळे खासकरून इलेक्ट्रि टू व्हीलर घेण्याचा विचार करणाऱ्या ग्राहकांच्या खिशाला कात्री बसणार आहे. अवजड उद्योग मंत्रालयाने 21 मे 2023 रोजी एक अधिसूचना जारी केली होती की, त्यानुसार सरकार आता इलेक्ट्रिक टू व्हीलरवरील अनुदान कमी करणार आहे. टू व्हीलर इलेक्ट्रिक वाहनांवरील अनुदान 15,000 रुपये प्रति किलोवॅटवरून 10,000 रुपये प्रति किलोवॅट करण्यात आले आहे. त्यामुळे इलेक्ट्रिक टू व्हीलर खरेदी करण्यासाठी 25,000 रुपयांपर्यंत खर्च येऊ शकतो.

कप सिपचणी होणार चाचणी
ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) अधिकृत नोटीसमध्ये म्हटले आहे की, कफ सिरपच्या निर्यातदारांना निर्यात करण्यापूर्वी सरकारी प्रयोगशाळेने जारी केलेले प्रमाणपत्र अधिकाऱ्यांना दाखवावे लागेल. त्यामुळे आजपासून कोणत्याही कफ सिरपची चाचणी केल्यानंतरच त्याची निर्यात करण्यास सरकारकडून परवानगी दिली जाणार आहे. यासाठी विदेशी व्यापार महासंचालनालयाने (DGFT) नोटीसही जारी केली आहे.
- Advertisement -

 

- Advertisment -