घरट्रेंडिंगउद्यापासून होणार 'हे' नवे नियम लागू; कोरोना लसीच्या पुढील टप्प्यात आणखी बरेच...

उद्यापासून होणार ‘हे’ नवे नियम लागू; कोरोना लसीच्या पुढील टप्प्यात आणखी बरेच बदल

Subscribe

उद्यापासून अर्थात १ मार्च पासून नवीन महिन्याच्या सुरूवातीस काही नवीन नियम लागू केले जाणार आहेत. उद्यापासून कोरोना लसीकरणाचा पुढील टप्पा सुरू होणार असून, त्याअंतर्गत ६० वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्या लोकांना कोरोनाची लस दिली जाणार आहे. यासह बँक ऑफ बडोदामध्ये विलीनीकरणानंतर आता उद्यापासून नवीन नियम लागू होणार आहे. विजया आणि देना बँकेचे ग्राहक जुन्या IFSC कोडमधून पैसे हस्तांतरित करू शकणार नाहीत.

उद्यापासून लसीकरणाचा पुढील टप्प्यास सुरूवात

देशभऱात कोरोना लसीकरणाची मोहिम युद्धपातळीवर सुरू झाली असून, उद्या देशभरात कोरोना लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू होणार आहे. या टप्प्यात ६० वर्षांहून अधिक वय असणाऱ्या नागरिकांसह ४५ वर्षांपेक्षा जास्त वयाचे लोक गंभीर आजारांनी ग्रस्त असतील अशा नागरिकांना कोरोनाची लस १ मार्चपासून मिळणार आहे. ही लस सरकारी रूग्णालयात मोफत असेल तर खासगी रुग्णालयात २५० रुपयांना सामान्य नागरिकांना उपलब्ध होणार आहे.

- Advertisement -

ग्राहकांना नवीन आयएफएससी कोड आवश्यक

केंद्र सरकारने विजया आणि देना बँक यांचे बँक ऑफ बडोदामध्ये विलीनीकरण केले आहे. विलीनीकरणानंतर उद्यापासून नवीन नियम लागू केले जाणार असल्याचे सांगितले जात आहे. अशा परिस्थितीत, जुना आयएफएससी कोड यापुढे काम करू शकणार नाही. विजया आणि बँक ग्राहकांना बँक ऑफ बडोदाकडून नवीन आयएफएससी कोड मिळवावा लागेल. विजया आणि देना बँकेचे ग्राहक www.bankofbaroda.in वर बँक ऑफ बडोदाच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन हा कोड उपलब्ध करू शकतात. याशिवाय बँक ऑफ बडोदाच्या जवळच्या शाखेत जाऊन आवश्यक कागदपत्रे देऊन नवीन आयएफएससी कोड देखील ग्राहक मिळवू शकता.

गॅस सिलेंडरच्या किंमतीत वाढ होणार?

दर महिन्याच्या पहिल्या तारखेला तेल कंपन्या सिलेंडरच्या नवीन किंमती निश्चित करतात. उद्यापासून घरगुती सिलेंडरकरता समान्य नागरिकाला किती पैसै मोजावे लागतील हे लवकरच निश्चित करण्यात येणार आहे. दरम्यान, गेल्या काही दिवासांपूर्वीच सरकारी तेल कंपन्यांनी सर्वसामान्यांना आणखी एक धक्का दिला आहे. तेल कंपन्यांनी एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत वाढ केली आहे. या महिन्यात तिसऱ्यांदा सिलेंडर महाग झाले आहे. तेल कंपन्या दरमहा एलपीजी सिलेंडरच्या किंमतींचा आढावा घेत असतात. प्रत्येक राज्यात असणाऱ्या वेगवेगळ्या करानुसार, एलपीजीची किंमत बदलत असते. तेल कंपन्यांनी घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमतीत २५ रुपयांची वाढ केल्याने सामान्यांचे महिन्याचे बजेट पुन्हा एकदा कोलमडले आहे.

- Advertisement -

इंधन दरवाढ होणार की नाही?

दररोज पेट्रोल डिझेलचे दर निश्चित केले जातात, परंतु फेब्रुवारीच्या शेवटच्या दिवशी कोणतेही बदल केले नसल्याचे समोर आले आहे. मात्र इंधन दरवाढ झाल्यानंतर ही किंमत अशीच राहिल की मार्चमध्ये पुन्हा महागाईचे सत्र सुरू होईल. हे पाहणं सामान्य नागरिकांसाठी आवश्यक असणार आहे.

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -