घरदेश-विदेशNew Ruls: आजपासून चेक बुक ते ATM मधून पैसे काढण्यापर्यंत बदलणार बँकिंगचे...

New Ruls: आजपासून चेक बुक ते ATM मधून पैसे काढण्यापर्यंत बदलणार बँकिंगचे नियम

Subscribe

एलपीजीच्या दरामध्ये बदल होण्याची शक्यत आहे. काय आहेत हे नविन नियम व अटी आपण जाणून घेणार आहोत.

आजपासून जुलै महिन्याची सुरूवात झाली आहे. आणि या नाविन्यपुर्ण महिन्याच्या सुरुवातीने प्रत्येकाच्या जिवनात अनेक बदल होणार आहे. याचदरम्यान इन्कम टॅक्स टिपार्टमेंट टीडीएस अंतर्गत नवीन नियमांची अंमलबजावणी करण्यात आली आहे तसेच आजपासून एसबीआय बॅंकेने आपल्या कॅश विड्रॉवल सोबतच चेक बुकसाठी काही नविन नियम व अटी लागू केल्या आहेत. इतकेच नाही तर एलपीजीच्या दरामध्ये बदल होण्याची शक्यत आहे. काय आहेत हे नविन नियम व अटी आपण जाणून घेणार आहोत.
SBI बॅकेच्या ATM विड्रॉवलमध्ये जास्त चार्जेस कपात होतील
आजपासून देशातील सर्वात मोठी बॅंक मानल्या जाणाऱ्या भारतीय स्टेट बँकेत अनेक नविन अटी,नियमांमधे बदल करण्यात आले आहेत. आजपासून SBI बँकेच्या ATM मधून जर तुम्ही एका महिन्यात चार वेळेपेक्षा ज्यास्त वेळा रक्कम काढत असणार तर तुम्हांला एक्सट्रा चार्ज द्यावा लागणार आहे. चार वेळ रक्कम काढल्यानंतर प्रत्येक विड्रॉवल दरम्यान 15 रुपये आणि GST सकट तुमच्या बँकेतून रक्कम कपात होणार. सर्व नवीन सर्विस चार्जेस बेसिक सेविंग्स बँक डिपॉजिट अकाउंटहोल्डर्संना लागू केले जातील.

SBI चेकबुकसाठी हे अणार नियम
कॅश विड्रॉवल व्यतीरीक्त SBI चेकबुकसाठी नवे नियम लागू करण्यात आले आहेत. या नियमांअतर्गत एसबीआय बँकेच्या चेकबुक वापरासाठी जास्त रक्कम मोजावी लागणार आहे. अकाउंटहोल्डर्सला 10 चेक घेतल्यानंतर 40 रुपये प्लस जीएसटी चार्ज द्यावा लागणार आहे. SBI बँकेने बेसिक सेविंग बँक डिपॉजिट अकाउंटहोल्डर्संना दरवर्षी 10 पानांचे चेकबुक विनामुल्या देते. यानंतर जर ग्राहक 10 पानांचे चेकबुक इश्यू करतील तर त्यांना 40 रुपये तसेच GST चार्ज द्यावा लागणार. जर ग्राहक 25 पानांचा चेकबुक घेणार तर त्यांना 75 रुपयांसोबतच GST चार्ज भरावा लागेल. SBI आत 10 पानांच्या एमरजंसी चेकबुक करिता 50 रुपये तसेच त्यावर GST चार्ज घेणार आहे. या नवीन नियमांअतर्गत सीनियर सिटीजन्संना चेकबुकच्या नव्या नियमांमध्ये सूट देण्यात आली आहे.

- Advertisement -

ITR भरले नसणार तर TDS मध्ये जास्त कपात होणार
आजपासून आयकर विभाग रिटर्न न भरणाऱ्या ग्राहकांकडून जास्त टीडीएस, टीसीएस वसूल करणार आहे. तसेच हा नियम अशा ग्राहकांना लागू होणार आहे ज्यांचे दरवर्षी टीडीएस रक्कम 50,000 रुपए किंवा यापेक्षा जास्त आहे. इनकम टॅक्स रिटर्न रक्कम मेंन्शन न करणाऱ्या ग्राहकांना लागू दरापेक्षा ज्यादा परंतू टॅक्स कपातीचा नियम आखण्यात आला आहे.

IFSC कोड बदलणार
आजपासून सिंडिकेट बँकेचा IFSC बदलणार आहे. गेल्या वर्षी सिंडिकेट बँकेला कॅनरा बँकेसोबत एकत्रीकरण करण्यात आले होते. आजपासून सिंडीकेट बँकेच्या ग्राहकांना कॅनरा बँकेचं नविन IFSC कोड मिळणार आहे. तसेच आजपासून सिंडिकेट बँकेचा IFSC कोड इनवॅलिड असणार आहे.

- Advertisement -

LPG च्या किमतीत होऊ शकतो बदल
दर महिन्याच्या पहिल्या तारखेला केंद्र सरकार LPG सिलेंडरच्या किंमतीची घोषणा करताता. गेल्या महिन्यात सरकारने 19 किलोच्या कमर्शियल सिलेंडरची किमतीमध्ये 122 रुपए कपात केली होती. यावेळेस गॅसच्या किंमतीत बदलाव होण्याची नक्की खात्री आहे, कारण कच्च्या तेलाच्या किंमती वाढत आहेत.



हे हि वाचा  – भारत सरकारने एप्रिलमध्ये Google कडे केल्या २७ हजार तक्रारी, तर ५९ हजाराहून अधिक कंटेन्ट केला डिलीट



 

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -