Saturday, June 19, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर देश-विदेश SBI च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! बँकेच्या कामकाजाच्या वेळेत बदल; जाणून घ्या नवी...

SBI च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! बँकेच्या कामकाजाच्या वेळेत बदल; जाणून घ्या नवी वेळ

Related Story

- Advertisement -

देशभरात कोरोनाचा कहर सुरू असून कोरोनाची दुसरी लाट पाहता देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या बँक शाखांच्या कामकाजाच्या वेळेत बदल केला आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता होणारी गर्दी रोखण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग आणि लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करणे हा त्या मागचा हेतू आहे. SBI ग्राहक आणि कर्मचार्‍यांना संरक्षण देण्यासाठी सतत महत्त्वाची पावले उचलत आहे. तसेच बँक ग्राहकांसाठी एक चांगली बातमी आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने बँक बंद होण्याच्या वेळेत बदल केला आहे. आता एसबीआयच्या सर्व शाखांतील कामकाज सकाळी १० ते सायंकाळी ४ या वेळेत सुरू राहिल. कोरोना संसर्गामुळे बँकांच्या कामकाजावरही परिणाम झाला आहे. त्यामुळे बँकांची संघटना असलेल्या राज्यस्तरीय बँकर्स समितीने परिपत्रक काढून कामकाजाचे प्रमाण कमी करून कर्मचार्‍यांना कपात करण्याचे निर्देश दिले.

यापूर्वी SBI मध्ये दुपारी दोन वाजेपर्यंत काम सुरू होते आता त्याच्या वेळेत बदल करण्यात आला असून आता देशभरातील SBI च्या शाखा सकाळी १० ते सायंकाळी ४ या वेळेत खुल्या असतील, असे एसबीआयने ट्विट करून माहिती दिली आहे. SBI आता आपल्या बँक शाखेत कामकाजाच्या वेळेत बदल करून सकाळी १० ते संध्याकाळी ४ या वेळेत केले आहे. कोरोनाच्या परिस्थितीत ग्राहकांना बँकेने त्यांचे बहुतेक बँकिंग काम हे ऑनलाईन करण्याचा आणि अत्यावश्यक काम असेल तरच शाखेत जाण्याचा सल्ला दिला आहे. जेणेकरून कोरोनाचा संसर्ग रोखण्यास मदत होईल, कोविड -१९ ची सद्यस्थिती लक्षात घेता बँक SLBC (राज्यस्तरीय बँकर्स समिती) च्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करीत असल्याचे बँकेकडून सांगण्यात आले आहे.

- Advertisement -

बँकेत आता होणार ठराविक कामं

यासह एसबीआय बँकेने त्यांच्या शाखांमधील काम मर्यादित केले आहे. त्यामुळे आता बँकेत ठराविक कामं केली जाणार आहेत. ट्विटरवर देण्यात आलेल्या माहितीनुसार आता ही चार कामे एसबीआयच्या शाखेत करण्यात येणार आहेत.

- Advertisement -

1. पैसे डिपॉझिट करणे किंवा पैसे काढणे
२. चेक क्लिअरिंग
३. ड्राफ्ट, आरटीजीएस आणि एनईएफटीशी संबंधित काम
४. शासकीय चलान संबंधित काम

यासह, बँकेने ट्विटरवर एक व्हिडिओ जारी केला आहे. यात त्यांनी बँक शाखेत कार्यरत ग्राहक तसेच ग्राहकांशी कसे वागावे याची माहिती दिली आहे. मास्कशिवाय कोणालाही बँक शाखांमध्ये प्रवेश दिला जाणार नाही. या व्यतिरिक्त बँक वेळोवेळी शाखांच्या स्वच्छतेसह इतर गोष्टींची काळजी घेईल.

SBI फोन बँकिंग सेवेचा लाभ घ्या

एसबीआय फोन बँकिंगसाठी प्रथम नोंदणी करावी लागेल. यानंतर पासवर्ड तयार करावा लागतो, ग्राहक संपर्क केंद्राद्वारे फोनवर खाली दिलेल्या सेवेचा लाभ घेऊ शकतात.

बँक खात्याची माहिती

आपण खात्याशी संबंधित माहिती मिळवू शकता. याशिवाय शिल्लक आणि व्यवहाराची संपूर्ण माहिती उपलब्ध असेल. जास्तीत जास्त ६ महिन्यांचे बँक स्टेटमेंट पोस्ट किंवा ईमेलद्वारे मागवले जाऊ शकतात.

- Advertisement -