घरताज्या घडामोडीधक्कादायक ! PCR टेस्टमध्येही न आढळणारा कोरोनाचा नवा स्ट्रेन सापडला

धक्कादायक ! PCR टेस्टमध्येही न आढळणारा कोरोनाचा नवा स्ट्रेन सापडला

Subscribe

कोरोना व्हायरसच्या स्ट्रेनमध्ये आतापर्यंतच्या सर्वात वेगळा असा स्ट्रेन फ्रेंच देशात आढळला आहे. फ्रेंच देशातील ब्रिट्टनी (Brittany) येथे हा कोरोनाचा नवा स्ट्रेन आढळल्याचे फ्रेंचच्या आरोग्य मंत्रालयाकडून याबाबतचे अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आले आहे. सर्वात धोकादायक म्हणजे कोरोनाचा हा नवीन स्ट्रेन polymerase chain reaction (PCR) पीसीआर टेस्टमध्ये निगेटीव्ह येत आहे. फ्रेंचमध्ये लॅनिनन शहरातील हॉस्पिटलमध्ये कोरोनाचा हा नवा स्ट्रेन आढळल्यासा खुलासा फ्रेंचच्या आऱोग्यमंत्रालयाकडून करण्यात आला आहे. यापूर्वीच अनेक देशांमध्ये कोरोनाच्या म्युटेड स्ट्रेनचे अनेक प्रकार पहायला मिळाले आहेत. त्यामध्येच फ्रान्समध्ये सापडलेल्या स्ट्रेनमुळे एकच खळबळ उडाली आहे.

फ्रेंचच्या लॅनिनमध्ये एका हॉस्पिटलमध्ये काही कोरोना रूग्णांच्या प्रकरणात हा नवीन वेरीयंट सापडला आहे. एकुण आठ रूग्णांमध्ये हा नवा स्ट्रेन आढळला आहे. फ्रान्सच्या आरोग्य मंत्रालयाने या नव्या सापडलेल्या स्ट्रेनला Breton variant असे नाव दिले आहे. महत्वाचे म्हणजे polymerase chain reaction (PCR) पीसीआर टेस्टमध्ये हा नवीन स्ट्रेन निगेटीव्ह येत आहे. पण दिलासा देणारी गोष्ट म्हणजे याआधीच्या वेरीयंटच्या तुलनेत हा नवीन स्ट्रेन जास्त संक्रमण पसरवणारा किंवा अधिक धोकादायक असल्याची सुरूवातीची कोणतीही लक्षणे आढळलेली नाहीत. या नव्या स्ट्रेनबाबत आणखी नवीन माहिती समोर आलेली नसल्याचे आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

- Advertisement -

फ्रान्समध्ये आतापर्यंत कोरोना व्हायरसच्या संक्रमणाची एकुण ४० लाख प्रकरणे समोर आलेली आहेत. पहिल्यांदा डिसेंबर २०१९ मध्ये चीनमधून या देशात आलेला कोरोनाचा पहिला रूग्ण सापडला होता. फ्रान्सच्या यंत्रणेने जाहीर केल्यानुसार कोविड १९ चे गेल्या २४ तासांमधील आयसीयूतील रूग्णांची संख्या ही ९२ होती. तर एकुण नव्याने आढळलेल्या रूग्णांची संख्या ही ४ हजार २१९ इतकी आहे. नोव्हेंबर महिन्यापासून ही सर्वाधिक अशी रूग्णांची संख्या आहे. गेल्या सात दिवसांमध्ये एकुण ३३३ इतक्या कोरोना रूग्णांच्या आकड्याची भर कोरोना रूग्णांमध्ये पडलेली आहे. तर पॅरीसमधील अनेक हॉस्पिटलमध्ये आयसीयू सातत्याने व्यस्त असल्याने फ्रान्सच्या आरोग्य यंत्रणेवर तणाव असल्याचे फ्रान्सच्या आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -