New Covid Variant: नव्या व्हेरियंटमुळे जग चिंतेत; आता इस्राईलमध्ये आढळली केस, जर्मनी प्रवासावर लावणार बंदी

corona

दक्षिण आफ्रिकेत आढलेल्या कोरोनाच्या नवीन व्हेरियंट B.1.1.529 यामुळे जगभरातील देश अलर्ट झाले आहेत. तज्ज्ञांच्या मते, कोरोनाचा नवा व्हेरियंट आतापर्यंतचे सर्वात म्युटेड व्हर्जन आहे. त्यामुळे आता सर्व देश अलर्ट झाले आहेत. या पार्श्वभूमीवर जर्मनी दक्षिण आफ्रिकेतून येणाऱ्या प्रवाशांवर बंदी घालणार आहे. इटलीने दक्षिण आफ्रिकेतून येणाऱ्या विमानांवर बंदी घातली आहे. युरोपियन युनियनने देखील दक्षिण आफ्रिकेतून येणाऱ्या विमानांवर बंदी घालण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान इस्राईलमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या नव्या व्हेरियंटचा रुग्ण आढळल्याचे समोर आले आहे.

भारतातील काय परिस्थिती?

आतापर्यंत भारतात नव्या व्हेरियंटचा कोणताही रुग्ण आढळलेला नाही. याबाबतची माहिती एएनआय या वृत्तसंस्थेने दिली आहे. पण नव्या व्हेरियंटच्या अनुषंगाने केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सर्व राज्यांना आणि केंद्राशासित प्रदेशांना पत्र लिहिले आहे. कोरोनाचा नवा B.1.1.529 व्हेरियंट खूप अधिक म्युटेड आहे. देशावर याचा गंभीर परिणाम होऊ शकतो. अशा परिस्थितीत व्हिसावरील निर्बंध शिथिल करणे आणि आंतरराष्ट्रीय प्रवासामुळे अडचणी वाढू शकतात. दरम्यान ज्या देशात नव्या व्हेरियंटचे रुग्ण आढळले आहेत, त्याचे टेस्टिंग, ट्रॅकिंग केले जाईल, असे राजेश भूषण यांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान दक्षिण आफ्रिका सरकारने सरकारी आणि खासगी प्रयोगशाळेंना जीनोम सिक्वेंसिंग करण्याचा सल्ला दिला आहे. कारण हा व्हेरियंट किती धोकादायक आहे, किती परिणामकारण आहे, हे सर्वकाही समजेल.


हेही वाचा – South Africa Corona Variant: कोरोनाचा नवा व्हेरियंट B.1.1.529 एड्स रुग्णापासून म्युटेट झाला?