घरCORONA UPDATEचीनमध्ये ओमिक्रॉनचा नवा व्हेरियंट सापडला, जागतिक आरोग्य संघटनेने दिला इशारा

चीनमध्ये ओमिक्रॉनचा नवा व्हेरियंट सापडला, जागतिक आरोग्य संघटनेने दिला इशारा

Subscribe

वुहान – चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाने हाहाकार माजवला आहे. चीनमध्ये ओमिक्रॉनच्या नव्या प्रजातीचे रुग्ण वाढले असून ही प्रजात अत्यंत संसर्गजन्य असल्याचं सांगितलं जातंय. Omicron BA.5.1.7  असं या प्रजातीचं नाव असून वायव्य चीनमध्ये याचे रुग्ण आढळून आले आहेत. तसंच, या विषाणूचा प्रसार झपाट्याने होत असल्याची माहिती माहिती रोग प्रतिबंधक आणि नियंत्रण केंद्राचे उपसंचालक ली शुजियान यांनी ग्लोबल टाइम्सच्या अहवालानुसार दिली.

कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यापासून नियमित नवनवे व्हेरियंट तयार होत आहेत. कोरोनाचा जन्मही चीनपासूनच झाला. त्यानंतर, अनेक व्हेरियंटही चीनमधून जगभर पसरत आहेत. आता ओमिक्रॉनचा BA.5.1.7 हा व्हेरियटंही चीनमध्यचे सापडला आहे. ४ ऑक्टोबरपासून नोंदवलेल्या कोरोना रुग्णांमध्ये हे व्हेरियंट सापडले आहेत. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने अत्यंत संसर्गजन्य BF.7 कोविड उप प्रकाराविरूद्ध देखील इशारा दिली. त्यामुळे, या विषाणूचा अधिक प्रसार होण्याआधीच त्यावर नियंत्रण मिळवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

- Advertisement -

दरम्यान, कोरोनावर नियंत्रण मिळवण्याकरता चीनने अनेक शहरांमध्ये लॉकडाऊन लावण्यात येणार आहे. जगभर कोरोनाचा प्रसार कमी झालेला असताना चीनमध्ये मात्र पुन्हा एकदा लॉकडाऊनसदृष परिस्थिती निर्माण झाली आहे. 9 ऑक्टोबरला चीनमध्ये 1 हजार 939 कोरोनाबाधित सापडले होते. २० ऑगस्टनंतरची ही सर्वाधिक आकडेवारी आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -