घरताज्या घडामोडीOmicron Variant: ओमिक्रॉनच्या भितीने न्यूयॉर्कमध्ये आणीबाणी घोषित, 'महामारी 2.0' येण्याचा शास्रज्ञांचा इशारा

Omicron Variant: ओमिक्रॉनच्या भितीने न्यूयॉर्कमध्ये आणीबाणी घोषित, ‘महामारी 2.0’ येण्याचा शास्रज्ञांचा इशारा

Subscribe

देशातून प्रवासी न्यूयॉर्कमध्ये येत आहेत. त्यामुळे लवकरच या प्रवाशांची चाचणी करुन बाधितांचा शोध घेतला जाईल

कोरोना व्हायरसच्या नव्या ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर न्यूयॉर्क सरकारने शुक्रवारी देशात आणीबाणी घोषित केली आहे. एप्रिल २०२०मध्ये कोरोनामुळे न्यूयॉर्कमध्ये आपत्तीजनक परिस्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर पुन्हा एकदा कोरोनाचा नवा व्हेरिएंट चिंता वाढवत आहे. वैज्ञानिकांच्या म्हणण्यानुसार, कोरोनाचा हा व्हेरिएंट सर्वांत चिंताजनक असून महामारी 2.O येण्याची शक्यता आहे. शास्रज्ञांच्या इशाऱ्यानंतर न्यूयॉर्क सरकारने पुन्हा एकदा देशात आणीबाणी घोषित केली आहे.

डेलीमेलशी बोलताना वैज्ञानिकांनी सांगितलं, देशात प्रवासावर निर्बध लावण्यात आले आहेत. अमेरिकेत ओमिक्रॉन व्हेरिएंटला रोखण्यासाठी आठ दक्षिण आफ्रिकी देशातून येणाऱ्या वाहतूकीवर निर्बंध घालण्याल आले आहेत. शुक्रवारी रात्री दक्षिण आफ्रिकीहून एक फ्लाइट नेदरलँडमध्ये उतरले त्यातील काही प्रवासी हे संक्रमित होते. त्या सगळ्या प्रवाशांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. त्यांच्या चाचण्या करण्यात आल्या आहे.

- Advertisement -

न्यूयॉर्कमध्ये ३ डिसेंबरपासून अंशत: लॉकडाऊन करण्यावर विचार करण्यात येत आहे. रुग्णांची संख्या तोवर कमी झाली तर या निर्णयाला स्थगिती देण्यात येईल. रुग्णालयांमध्ये १० टक्क्यांहून कमी स्टाफ बेड क्षमता उपलब्ध आहे. २०२०मध्ये आलेल्या कोरोना संक्रमणाचा दर सर्वोच्च असल्याने देशात आणीबाणी घोषित करण्यात आली आहे.

न्यूयॉर्कमध्ये ओमिक्रॉनचे रुग्ण सापडलेले नाही मात्र त्यांचा आता शोध घेण्यात येणार आहे. अनेक देशातून प्रवासी न्यूयॉर्कमध्ये येत आहेत. त्यामुळे लवकरच या प्रवाशांची चाचणी करुन बाधितांचा शोध घेतला जाईल असे न्यूयॉर्क सरकारकडून सांगण्यात आले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – omicron Variant: ओमिक्रॉन व्हेरिएंटला घाबरण्याची गरज नाही – ICMR

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -