घरदेश-विदेशNew York Shooting Suspect : ब्रुकलिन मेट्रो स्टेशन गोळीबार प्रकरणातील संशयिताची ओळख...

New York Shooting Suspect : ब्रुकलिन मेट्रो स्टेशन गोळीबार प्रकरणातील संशयिताची ओळख पटली; संशयिताचे फोटो जारी

Subscribe

New York Shooting Suspect : अमेरिकेच्या न्युयॉर्कमधील ब्रुकलिन सबवे मेट्रो स्टेशनवर 12 एप्रिल रोजी बेछूट गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात आत्तापर्यंत 8 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर 20 अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. दरम्यान हा दहशतवादी हल्ला असल्याची संशय व्यक्त होत आहे. त्यामुळे या हल्ल्यामागील गुन्हेगार कोण आहे याचा तपास पोलीस करत आहे. यातच एका संशयिताचा फोटो समोर आला असून त्याची पोलीस चौकशी करत आहेत. दरम्यान ब्रुकलिन सबवे स्टेशनवर गोळीबार करणाऱ्या संशयिताची ओळख पटल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. या संशयित आरोपीचा फोटो देखील न्यूयॉर्क पोलिसांनी शेअर केला आहे. या फोटोतील संशयित आरोपीचे नाव फ्रँक जेम्स असल्याचे म्हटले जातेय.

हा फोटो शेअर करत न्यूयॉर्क पोलिसांनी नागरिकांना अपील केले की, तुमची एक सुचना आम्हाला मदत करू शकते. नागरिकांना केलेले आवाहन आणि ट्विटरवर शेअर केलेला संशयिताचा फोटो यामुळे पोलिसांना आरोपीला अटक करण्यात यश मिळू शकतो.

- Advertisement -

न्यूयॉर्क पोलिसांनी एका संशयिताचा फोटो शेअर करत म्हटले की, एक वेळ पहा, हा इसम ब्रुकलिन येथील स्ट्रीट सबवे स्टेशनवर झालेल्या गोळीबार प्रकरणातील संशयित आरोपी आहे, सध्या आमचा तपास सुरु आहे. मात्र आपली एक सुचना आम्हाला मदत करू शकते. दरम्यान पोलिसांनी ही घटना दहशतवादी घटनेशी जोडली आहे.

रॉयटर वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, फ्रँक जेम्स याचे वय ६२ असून तो विस्कान्सिन किंवा फिलाडेल्फियाचा रहिवासी असू शकतो. संशयिताने हल्ल्याच्या घटनेवेळी गॅस मास्क आणि बांधकामासाठी वापरण्यात येणारे कपडे परिधान केले होते. त्याच्या हातात धातूचे एक गोलाकार छोटे पात्र होते. जे टाकताच त्यातून धूर पसरू लागला त्यामुळे घाबरलेल्या अवस्थेत लोक जीव वाचवण्यासाठी पळू लागले. दरम्यान काही लोक जखमी झाले. याच संधीचा फायदा घेत आरोपीने बेछूट गोळीबार केला. ज्यात अनेक नागरिक बळी पडले. स्टेशन परिसरात जखमी अवस्थेतील लोक जीव वाचवण्यासाठी मदत मागत होते. या घटनेत आत्तापर्यंत 8 जण मृत्यूमुखी पडले असून 13 नागरिक जखमी झाले आहेत.

- Advertisement -

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -