Monday, June 5, 2023
27 C
Mumbai
घर देश-विदेश तुर्की, सीरियानंतर 'हा' देश भूकंपाने हादरला, 6.1 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप

तुर्की, सीरियानंतर ‘हा’ देश भूकंपाने हादरला, 6.1 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप

Subscribe

तुर्की, सीरिया, पॅलेस्टाईननंतर आता न्यूझीलंड तीव्र भूकंपाच्या धक्क्यांनी हादरला आहे. न्यूझीलंडमध्ये आज 6.1 रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. न्यूझीलंडच्या वायव्येकडील लोअर हट शहरात हे धक्के बसले आहेत. दरम्यान या भूकंपामुळे जीवितहानी झाल्याची कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही. एएनआय वृत्तसंस्थेने ट्वीट करत या भूकंपाची माहिती दिली आहे.

न्यूझीलंडच्या स्थानिक वेळेनुसार, बुधवारी सकाळी 7.38 वाजेच्या सुमारास 6.1 तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. या भूकंपाचे केंद्र जमिनीपासून 57.4 किलोमीटर खोल होते. पारापरामुच्या वायव्येस 50 किमी अंतरावर हा भूकंप झाला आहे. दरम्यान या दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. न्यूझीलंडच्या लोअर हटपासून अंदाजे 78 किमी अंतरावर भूकंपाचा धक्का बसल्याची माहिती आहे.

- Advertisement -

न्यूझीलंडच्या रापरामु, लेविन, पोरिरुआ, फ्रेंच पास, अप्पर हट, लोअर हट, वेलिंग्टन, वांगानुई, वेव्हरले, पामरस्टन नॉर्थ, फील्डिंग, पिक्टन, एकेताहुना, मास्टरटन, मार्टिनबरो, हंटरविले, हावेरा, ब्लेनहाइम, सेडन, नेल्सन, डॅनिव्हिरके, पोंगारोआ, स्ट्रॅटफोर्ड, ओपुनाके, तैहापे, कॅसलपॉईंट, मोटुएका, ओहाकुने आणि आसपासच्या शहरात हे भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. त्यामुळे तुर्की, सीरियानंतर आता न्यूझीलंडमधील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे.

- Advertisement -

दरम्यान तुर्कीत झालेल्या भूकंपातील मृतांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या विनाशकारी भूकंपात आत्तापर्यंत 35 हजार 418 जणांचा मृत्यू झाला आहे. याठिकाणी मदत आणि बचत कार्य युद्धपातळीवर सुरु आहे. अद्याप ढिगाऱ्याखालून लोकांना बाहेर काढले जात आहे. पण भूकंप होऊन अधिक दिवस लोटल्याने ढिगाऱ्यात अडलेले लोकं वाचण्याची शक्यता कमी होत आहे.


धक्कादायक! नववीतील विद्यार्थ्याकडून सातवीतील विद्यार्थिनीवर बलात्कार, पीडिता गरोदर राहिल्याने बाब उघड


- Advertisment -