घरदेश-विदेशNew Zealand firing: खेळाडू थोडक्यात बचावले, ओव्हल कसोटी रद्द

New Zealand firing: खेळाडू थोडक्यात बचावले, ओव्हल कसोटी रद्द

Subscribe

बांगलादेश क्रिकेट बोर्ड आणि न्यूझीलंड क्रिकेट बोर्ड एकमेकांच्या संपर्कात असून, अधिकाऱ्यांच्या चर्चेनंतर पुढील ठोस निर्णय घेण्यात येणार आहे.

आज सकाळी न्यूझीलंच्या मशिदीमध्ये झालेल्या अंदाधुंद गोळीबारात बांगलादेशचे क्रिकेट संघाचे खेळाडू थोडक्यात बचावले. बांगलादेश क्रिकेट संघाचे खेळाडू सध्या सामन्यांसाठी न्यूझीलंड दौऱ्यावर आहेत. ‘बसमध्ये असलेले सर्व खेळाडू मशिदीत जाण्याची तयारी करत असताना अचानक हा गोळीबार झाला’, अशी माहिती बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे प्रवक्ते जलाल युनिस यांनी दिली आहे. दरम्यान, या घटनेनंतर न्यूझिलंड विरुद्ध बांगलादेश यांच्यामध्ये खेळवले जाणारे सामने रद्द करण्यात आले आहेत. ब्लॅककॅप्सच्या वृत्तानुसार, ओव्हल येथे खेळवली जाणारी टेस्ट सिरीज रद्द करण्यात आली आहे. गोळीबाराच्यावेळी बांगलादेशचे सर्व खेळाडू बसमध्ये असल्यामुळे या हल्ल्यातून ते अगदी थोडक्यात बचावले.दरम्यान, या घटनेनंतर खेळाडूंच्या सुरक्षिततेचा विचार करुन ही रद्द करण्यात आल्याचं समजतं आहे.

- Advertisement -

आमच्यासाठी प्रार्थना करा

गोळीबाराची घटना घडताचा बांगलादेशचे खेळाडू असलेली बस त्वरित हॉटेलच्या दिशेने वळवण्यात आली. उपलब्ध माहितीनुसार, सर्व खेळाडू सध्या त्यांच्या हॉटेलमध्ये सुरक्षित आहेत. ‘सर्व खेळाडू सुरक्षित आहेत पण या घटनेमुे सर्वांना मानसिक धक्का बसला आहे. तरी, आम्ही सर्व खेळाडूंना हॉटेलमध्येच थांबण्यास सांगितलं आहे’, अशी माहिती जलाल यांनी दिली आहे. तर बांगलादेश क्रिकेट संघाचा फंलदाज तमिम इकबालने ट्वीट करुन सांगितले आहे की, ‘गोळीबारातून संपूर्ण संघ बचावला आहे. ही खूपच भीतीदायक अनुभव होता. कृपया सर्वांनी आमच्यासाठी प्रार्थना करा’.

- Advertisement -

दरम्यान, सध्या बांगलादेश क्रिकेट बोर्ड आणि न्यूझीलंड क्रिकेट बोर्ड एकमेकांच्या संपर्कात असून, अधिकाऱ्यांच्या चर्चेनंतर पुढील ठोस निर्णय घेण्यात येणार आहे. न्यूझीलंडच्या दक्षिण आयलंड शहरातील मशिदीमध्ये झालेल्या या गोळीबारात २५ हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. या हल्ल्याप्रकरणी ४ जणांना अटक करण्यात आल्याचं वृत्त नुकतंच समोर आलं आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -