घरताज्या घडामोडीSmoke Free Country : 'या' देशात सिगारेट ओढण्यावर बंदी, कडक कायदा लागू

Smoke Free Country : ‘या’ देशात सिगारेट ओढण्यावर बंदी, कडक कायदा लागू

Subscribe

धूम्रपान आरोग्यासाठी हानिकारक असून, धुम्रपान टाळा अशा वारंवार सूचना दिल्या जातात. मात्र, या सूचनांकडे सातत्याने दुर्लक्ष केल्याचे पाहायला मिळते. अशातच न्यूझीलंड या देशाने धुम्रपानासंदर्भात एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार आता तरूणांच्या धूम्रपानावर बंदी येणार आहे.

धूम्रपान आरोग्यासाठी हानिकारक असून, धुम्रपान टाळा अशा वारंवार सूचना दिल्या जातात. मात्र, या सूचनांकडे सातत्याने दुर्लक्ष केल्याचे पाहायला मिळते. अशातच न्यूझीलंड या देशाने धुम्रपानासंदर्भात एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार आता तरूणांच्या धूम्रपानावर बंदी येणार आहे. याबाबत सरकारने मंगळवारी संसदेत एक कायदा मंजूर केला आहे. या कायद्यानुसार न्यूझीलंडच्या (2009 नंतर जन्मलेल्या) येणाऱ्या पिढ्यांना तंबाखू खरेदीवर बंदी घालण्यात येणार आहे. (New Zealand imposes lifetime ban on youth buying cigarettes to tobacco free country campaign anti smoking bill)

न्यूझीलंड सरकारच्या मते, पुढील पिढीसाठी धूम्रपान प्रतिबंधित करणारा हा जगातील पहिला कायदा असेल. नवीन कायद्यांनुसार, 1 जानेवारी 2009 किंवा त्यानंतर जन्मलेल्या कोणालाही तंबाखू विकण्यावर बंदी घालण्यात आली आहे. कोणीही उल्लंघन करताना आढळल्यास NZ$150,000 ($95,910) पर्यंत दंड होऊ शकतो. याव्यतिरिक्त, धूम्रपान बंदी व्यक्तीच्या संपूर्ण आयुष्यासाठी लागू राहील असेही कायद्यात नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, न्यूझीलंडमध्ये संमत झालेल्या या कायद्यानुसार धूम्रपानासाठी वापरल्या जाणाऱ्या तंबाखूजन्य पदार्थांमधील निकोटीनचे प्रमाणही कमी केले जाणार आहे.

- Advertisement -

या धुम्रपान बंदीच्या पार्श्वभूमीवर सहयोगी आरोग्य मंत्री डॉ. आयशा वेरल यांनी सांगितले की, “हा कायदा धूरमुक्त भविष्याकडे प्रगतीला गती देईल. हा कायदा संमत झाल्यानंतर हजारो लोक अधिक काळ जगतील, निरोगी आयुष्य जगतील आणि आरोग्य व्यवस्था अधिक चांगली होईल. शिवाय, धूम्रपानामुळे होणारे आजार (कर्करोग, हृदयविकाराचा झटका, पक्षाघात) टाळता येतील. कारण या आजारांवरील उपचार करणे खूप महाग आहे. 2023च्या अखेरीस तंबाखू विक्रीसाठी परवाना असलेल्या किरकोळ विक्रेत्यांची संख्या 6,000 वरून 600 पर्यंत कमी केली जाईल”.

“न्यूझीलंड 2025 पर्यंत देशाला धूम्रपानमुक्त करण्यासाठी धूम्रपान विरोधी कायदे आणखी कडक करणार आहे. भूतानमध्ये 2010 मध्येच सिगारेटच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली होती. त्याचप्रमाणे न्यूझीलंडमध्ये धूम्रपानविरोधी कडक कायदे असतील. न्यूझीलंडमधील प्रौढ धूम्रपान करणाऱ्यांची संख्या गेल्या दशकात निम्म्या पटींनी कमी होऊन ही संख्या आठ टक्क्यांवर आली आहे. गेल्या वर्षी 56,000 लोकांनी धूम्रपान सोडले आहे”, अशी माहिती डॉ. आयशा वेरल यांनी दिली.

- Advertisement -

हेही वाचा – संयुक्त राष्ट्रात पाकिस्तानकडून काश्मीर मुद्द्याला लक्ष्य; संसदेवरील हल्लाची आठवण करत जयशंकर यांची तिखट प्रतिक्रिया

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -