घरताज्या घडामोडीNew Zealand Terror Attack: न्युझीलँड सुपरमार्केटमध्ये दहशतवाद्याचा चाकू हल्ला!

New Zealand Terror Attack: न्युझीलँड सुपरमार्केटमध्ये दहशतवाद्याचा चाकू हल्ला!

Subscribe

न्युझीलँडमधील सुपरमार्केटवर दहशतवादी हल्ला झाल्याची माहिती पंतप्रधान जसिंदा आर्डर्न यांनी दिली आहे. माहितीनुसार, न्युझीलँडच्या ऑकलंडमध्ये चाकू हल्ला करून एका महिलेची हत्या केल्याचे सांगितले आहे. सुपरमार्केटवरील हा दहशतवादी हल्ला आयएसआयएससंबंधीत असल्याचा खुलासा झाला आहे. या हल्ल्यामध्ये ६ जण जखमी झाले असून याबाबतचे ट्वीट एएनआय वृत्तसंस्थेने केले आहे. (New Zealand supermarket stabbing a ‘terrorist’ attack)

- Advertisement -

न्युझीलँड पोलिसांनी ऑकलंडमधील एका सुपरमार्केटमध्ये चाकूहल्ला करणाऱ्या व्यक्तीचा खात्मा केला आहे. पोलिसांची गोळी लागलेल्या पहिल्या आरोपी व्यक्तीने एका महिलेवर चाकू हल्ला करून हत्या केली होती. बऱ्याच लोकांचा चाकू मारून त्यांने जखमी केले होते. आता पंतप्रधान जसिंदा आर्डर्न यांनी चाकूहल्ला दहशतवादी हल्ला असल्याचा दावा केला आहे. स्थानिक माध्यम वृत्तानुसार, या दहशतवादी हल्ल्यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला आहे. तर सहा लोक गंभीर जखमी झाले आहेत. घटनेच्या प्रत्यक्षदर्शींनी न्यूज आउटलेट स्टफ एनझेडला सांगितले, ‘एक व्यक्ती लोकांवर चाकू हल्ला करत असल्याचे पाहिले होते आणि स्थानिक दुकानदार खूप घाबरून इकडे-तिकडे पळताना दिसत होते.’

ऑकलंड स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एक व्यक्ती न्यू लिन सुपरमार्केटमध्ये घुसला आणि अनेक लोकांना त्याने जखमी केले. पोलिसांनी त्या व्यक्तीला गोळी मारली असून त्याचा घटनास्थळी मृत्यू झाला आहे. स्थानिक वृत्ताच्या माहितीनुसार, रुग्णालयात घेऊन गेलेल्या सहा जणांपैकी तीन जणांची प्रकृती गंभीर आहे. तर एकाची प्रकृती चिंताजनक आहे.

- Advertisement -

सुत्रांच्या माहितीनुसार, आरोपी दहशतवादी श्रीलंकेचा राहणारा आहे आणि तो आयएसआयएसशीसंबंधित असल्याचे म्हटले आहे.


हेही वाचा – Afghanistan: पंजशीरमध्ये ४० साथीदारांचे मृतदेह टाकून तालिबान्यांनी काढला पळ


Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -