घरताज्या घडामोडीआईच्या पोटातच करोनाची लागण

आईच्या पोटातच करोनाची लागण

Subscribe

एका नवजात बालकालाच करोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने महामारी जाहीर केल्याच्या पार्श्वभूमीवर जगभरातला पहिल्याच नवजात बालकाला करोनाने ग्रासल्याचे समोर आले आहे. लंडनमधील जन्मलेला हा नवजात बालक आहे. बाळाला करोनाची लक्षणे आढळल्यानेच या बाळाला तत्काळ नॉर्थ मिडलसेक्स हे बॉरो एनफिल्ड येथील हॉस्पिटल गाठले. या नवजात बालकाला न्युमोनियाची लक्षण आढळली होती. बाळ आईच्या पोटातच असतानाच या महिलेला करोनाची लागण झाली होती. पण डॉक्टरांनी बाळ जन्माला येण्यासाठीची वाट पाहिली. त्यानंतर तातडीने या बाळाची करोनाची चाचणी करण्यात आली.

आता या संपुर्ण करोना व्हायरसच्या लागण होण्याच्या प्रकरणात डॉक्टरांसमोर पेच प्रसंग उभा राहिला आहे. या बाळाला करोनाची लागण कशी झाली याचा शोध सध्या डॉक्टरांकडून घेण्यात येत आहे. जन्माअगोदरच या बाळाला करोनाची लागण झाल्याची माहिती आहे. आता या बाळाच्या आईवरही एका रूग्णालयात उपचार सुरू आहेत. तर बाळ हे एका वेगळ्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. आकापर्यंत युनायटेड किंगडममध्ये एकुण ७९८ करोनाच्या प्रकरणांची नोंद झाली आहे. तर आतापर्यंत १० जणांचा मृत्यू करोनामुळे झाला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -