घरताज्या घडामोडीअरे बापरे! काय सांगताय ६ फूटांपेक्षा जास्त उंची असलेल्यांना कोरोनाचा धोका?

अरे बापरे! काय सांगताय ६ फूटांपेक्षा जास्त उंची असलेल्यांना कोरोनाचा धोका?

Subscribe

ज्या व्यक्तींची उंची ६ फुटांपेक्षा जास्त आहे, अशा व्यक्तींना कोरोनाचा धोका जास्त आहे.

एकीकडे कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. तर दुसरीकडे या कोरोनाला आळा घालण्यासाठी सर्वच देश लसीच्या शोधात आहेत. तसेच जगभरातील शास्त्रज्ञ कोरोना संदर्भात वेगवेगळे रिसर्च करत आहेत. यातच एका अभ्यासातून धक्कादायक बाब समोर आली आहे. ज्या व्यक्तींची उंची ६ फुटांपेक्षा जास्त आहे, अशा व्यक्तींना कोरोनाचा धोका जास्त आहे. मॅनचेस्टर युनिव्हर्सिटी आणि ब्रिटनच्या मुक्त विद्यापीठासह आंतरराष्ट्रीय संशोधकांच्या पथकाने अमेरिका आणि ब्रिटनमधील सुमारे २ हजार लोकांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यातून ही माहिती समोर आली आहे.

काय केला दावा?

ब्रिटीश टेलिग्राफ या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तनुसार, या सर्वेक्षणातील वैज्ञानिक हे शोधण्याचा प्रयत्न करीत होते की लोकांच्या पर्सन प्रोफाइल जसे की काम आणि घरामुळे कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो का? त्याच वेळी, संशोधकांना असे आढळले की ६ फूटांपेक्षा जास्त उंची असलेल्या लोकांमध्ये कोरोना संसर्गाचा धोका जास्त असतो.

- Advertisement -

शास्त्रज्ञांच्या अभ्यासानुसार; कोरोना हवेमुळे पसरतो. त्यातच ड्रॉपलेटमुळे सध्या सर्वाधिक लोकं संक्रमित होत असल्याचे समोर आले आहे. केवळ ड्रॉपलेट खालून पसरत नाही तर त्यांचा संसर्ग हा हवेतूनही होऊ शकतो. ते म्हणाले की, घरातून कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी हवा शुद्धीकरण करणे गरजेचे आहे. त्यामुळे उंच व्यक्तींना त्याचा अधिक धोका असतो.


हेही वाचा – International Tiger Day 2020: भारतात पाचपटीने वाढू शकते वाघांची संख्या!

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -