घरताज्या घडामोडीNext CDS : सीडीएस जनरल बिपीन रावत यांच्या निधनानंतर पुढील CDS कोण...

Next CDS : सीडीएस जनरल बिपीन रावत यांच्या निधनानंतर पुढील CDS कोण असेल ? मनोज नरवणे यांचं नाव आघाडीवर

Subscribe

तामिळनाडूतील कुन्नूर येथे हेलिकॉप्टर कोसळून देशाचे पहिले सीडीएस जनरल बिपीन रावत यांच्या निधनानंतर संपूर्ण जगभरातून शोक व्यक्त केला जात आहे. आज (शुक्रवार) त्यांच्या पार्थिवावर अंतिम अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. परंतु बिपीन जनरल यांच्या निधनानंतर पुढील सीडीएस नावाची घोषणा करू शकतात. त्यामुळे येत्या ७ ते १० दिवसांमध्ये नवीन नावाची घोषणा केली जाणार असल्याची माहिती मिळत आहे. बिपीन रावत यांनी जानेवारी महिन्यातील २०२० मध्ये देशातील पहिले सीडीएस म्हणून पदभार सांभाळला होता. साधारणपणे ही वयोमर्यादा ६५ वर्षांसाठी निश्चित करण्यात आला आहे. मात्र, तिन्ही दलांची कमान सीडीएसच्या हाती आहे. त्यामुळे आता पुढील सीडीएस जबाबदारी कोणला दिली जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

लष्कर प्रमुख मनोज नरवणे यांचं नाव आघाडीवर

सेवाजेष्ठतेनुसार जनरल मनोज मुकुंद नरवणे यांचं नाव सध्या सीडीएसच्या आघाडीवर आहे. कारण ते लष्कर प्रमुख आहेत. संरक्षण दल प्रमुख रावत यांचे उत्तराधिकारी म्हणून लष्कर प्रमुख जनरल नरवणे यांच्यासह हवाईदल प्रमुख व्ही.आर. चौधरी आणि नौदल प्रमुख आर. हरी कुमार यांच्याही नावांची चर्चा आहे. जनरल नरवणे हे नौदल व हवाई दलातील त्यांच्या समकक्षांपेक्षा वरिष्ठ आहेत. त्यांनी ३१ डिसेंबर २०१९ रोजी लष्कराचे २७ वे प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला आहे. त्यांनी लष्कर प्रमुख म्हणून काम केले आहे. चौधरी यांनी ३० सप्टेंबर २०२१ रोजी हवाई दल प्रमुखपदाची सुत्रे स्वीकारली आहेत. तर हरी कुमार यांनी ३० नोव्हेंबर २०२१ रोजी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला आहे.

- Advertisement -

सीडीएस चीफ ऑफ स्टाफ कमिटीचे अध्यक्ष असतात. त्यामध्ये तिन्ही सेनेचा सहभाग असतो. जनरल नरवणे यांनी पूर्व लडाखमध्ये उत्तम कामगिरी केली आहे. त्यामुळे सीडीएसच्या पदी त्यांची नियुक्ती होण्याची जास्त शक्यता वर्तवली जात आहे. जनरल नरवणे हे तिन्ही सेनेतील प्रमुखांपेक्षा वरिष्ठ आहेत आणि येत्या एप्रिल महिन्यात ते सेवानिवृत्त होणार आहेत. एअर चीफ मार्शल आरकेएस भदौरिया यांचेही नाव सीडीएस होण्याच्या शर्यतीत आहेत. भदौरिया जून १९८० मध्ये आयएएफ च्या लढाऊ प्रवाहात सामील झाले आहेत आणि ४२ वर्षांच्या सेवेनंतर ते सेवानिवृत्त झाले आहेत.


हेही वाचा: ठाणे खाडी क्षेत्राला मान्यता मिळाल्यास राज्यातील हे तिसरे रामसर क्षेत्र असेल – पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे

- Advertisement -

 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -