NHAI कंपनीची विक्रमी धाव, 100 तासांत 100 किमीच्या रस्त्याची निर्मिती

गाझियाबाद-अलिगड एक्सप्रेस वेच्या 112 किमी रस्त्याचे काम हे 100 तासांत पूर्ण करण्यात आले आहे. त्यामुळे एका नव्या विक्रमाची नोंद झाली आहे.

NHAI company's record, construction of 100 km road in 100 hours

एका रस्त्याची निर्मिती करताना 1 किलोमीटरचा रस्ता तयार करताना देखील एक ते दोन दिवसाचा कालावधी लागतो. त्यामुळे 100 तासांत 100 किलोमीटरचा रस्ता तयार करण्यात आला, यांवर कदाचित कोणीच विश्वास ठेवणार नाही. पण हे एका रस्ते निर्मिती करणाऱ्या कंपनीने शक्य करून दाखवले आहे. गाझियाबाद-अलिगड एक्सप्रेस वेच्या 100 किमी रस्त्याचे काम हे 100 तासांत पूर्ण करण्यात आले आहे. त्यामुळे एका नव्या विक्रमाची नोंद झाली आहे. (NHAI company’s record, construction of 100 km road in 100 hours)

हेही वाचा – नाशिक होणार इलेक्ट्रॉनिक हब ; क्लस्टर निर्मितीसाठी जागा निश्चितीचे आदेश

नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया अर्थात NHAI या रस्त्यांचे बांधकाम करणाऱ्या कंपनीने हा विक्रम आपल्या नावे केला आहे. उत्तर प्रदेशमध्ये गाझियाबाद-अलिगड द्रुतगती मार्गावर 100 किमी लांबीचा रस्ता तयार करण्याचे काम 100 तासांत पूर्ण करण्यात आले आहे. 100 तासात 100 किलोमीटर अंतराचा रस्ता तयार करणे हा एक जागतिक विक्रम असल्याचे बोलले जात आहे. याआधी 105 तासांत 75 किलोमीटरचा रस्ता तयार करण्याचा विक्रम नोंदवला गेला आहे. गाझियाबाद-अलिगड एक्स्प्रेस-वेचे काम 15 मे रोजी सकाळी 10 वाजता सुरू करण्यात आले. त्यानंतर आज (ता. 19 मे) पहाटे 2 वाजता म्हणजेच 100 तासांत या रस्त्याचे काम पूर्ण झाले. गाझियाबाद-अलिगड एक्स्प्रेस-वे हा 6 लेनचा एक्स्प्रेस वे आहे.

गाझियाबाद-अलिगड एक्स्प्रेस-वेच्या कामासाठी 6 हॉटमिक्स प्लांट, 15 सेन्सर पेव्हर आणि 2000 लोकांना कामास लावण्यात आले होते. याशिवाय 250 अभियंते देखील या एक्स्प्रेस वेच्या बांधकामाची पाहणी करत होते. म्हणजेच एकूण 2 हजार 250 कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी रात्रंदिवस काम करत 100 तासांत हा रस्ता तयार करण्याचा मोठा विक्रम केला आहे. याबाबतची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी ट्विटरद्वारे दिली आहे.

2022 मध्ये महाराष्ट्रात देखील असाच एक विक्रम करण्यात आला होता. राष्ट्रीय महामार्ग 56 वरील अमरावती ते अकोलादरम्यान 107 तासांत 75 किलोमीटर ‘बिटुमिनस काँक्रिट’रस्ते बांधणीच्या कामाची ‘गिनेस बुक ऑफ वल्र्ड रेकॉर्ड’मध्ये या कामाची नोंद करण्यात आली होती. त्यावेळी देखील केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी याबाबतची माहिती ट्वीट करत दिली होती. त्यावेळी 720 हून अधिक कामगारांनी रात्रंदिवस काम केले.