घरदेश-विदेशखलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नूवर NIAची कारवाई; पंजाबमधील दोन ठिकाणी मालमत्ता जप्त

खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नूवर NIAची कारवाई; पंजाबमधील दोन ठिकाणी मालमत्ता जप्त

Subscribe

नवी दिल्ली : भारत आणि कॅनडा यांच्यातील संबंधांमध्ये सध्या तणावाचे वातावरण आहे. खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येनंतर तणाव निर्माण झाला असून शिख फॉर जस्टिसचे कायदेशीर सल्लागार गुरपतवंत पन्नूचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये तो भारतीय वंशाच्या हिंदूंनी कॅनडा सोडण्याचे आव्हान करताना दिसला. या व्हिडीओची भारताने दखल घेतली असून राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) खलिस्तानी दहशतवादी आणि बंदी घातलेल्या शीख फॉर जस्टिसच्या (SFJ) कायदेशीर सल्लागार गुरपतवंत सिंग पन्नू यांच्या पंजाबमधील अमृतसर आणि चंदीगडमधील मालमत्ता जप्त केल्या आहेत. गुरपतवंत सिंग पन्नू सध्या अमेरिकेत राहत असून तो तेथून सतत व्हिडीओच्या माध्यमातून भारताविरुद्ध विष पेरण्याचं काम करत असतो. (NIA action against Khalistani terrorist Gurpatwant Singh Pannu Property seized at two places in Punjab)

एनआयएने पन्नूच्या पंजाबमधील ज्या मालमत्ता जप्त केल्या आहेत, त्यामध्ये अमृतसर जिल्ह्याच्या बाहेरील खानकोट या वडिलोपार्जित गावातील 46 कनल शेती आणि सेक्टर 15, सी स्थित चंदीगडमधील त्याच्या घराचा समावेश आहे. पन्नूच्या मालमत्तेवर जप्ती केल्यामुळे त्याचा आता मालमत्तेवरील हक्क संपला असून ही मालमत्ता आता भारत सरकारची आहे. 2020 मध्येही त्यांची मालमत्ता जप्त करण्यात आली होती. एनआयएच्या कारवाईनंतर पन्नूने त्याच्या मालमत्तेवरील सर्व मालकी हक्क गमावले आहेत. तो त्याची मालमत्ता विकू शकत नाही.

- Advertisement -

हेही वाचा – ‘जो खेळेल तो फुलेल’; सचिनच्या उपस्थितीत वाराणसीत मोदींच्या हस्ते क्रिकेट स्टेडियमची पायाभरणी

एनआयएने मोहाली न्यायालयाच्या आदेशानुसार पन्नूच्या या सर्व मालमत्ता जप्त केल्या आहेत. एनआयएने पन्नूच्या घराबाहेर बोर्ड लावला असून त्यावर असे लिहिले आहे की, या संपत्तीवर पन्नूचा आता कोणताही अधिकार नसून ती आता सरकारी मालमत्ता झाली आहे. मोहाली येथे 2020 मध्ये दाखल झालेल्या एका गुन्ह्यात पन्नूला फरार घोषित करण्यात आले आहे. या घराचा चौथा भाग यापूर्वी एनआयए न्यायालयाच्या आदेशानुसार जोडण्यात आला होता. यासोबतच अमृतसरच्या खानकोट गावात पन्नूची 46 कनाल लागवडीयोग्य जमीनही जप्त करण्यात आली आहे.

- Advertisement -

गुरपतवंत सिंग पन्नूने काय धमकी दिली होती?

खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या कॅनडात झालेल्या मृत्यूवरून गुरपतवंत सिंग पन्नूने धमकी दिली होती की, भारतीय वंशाच्या हिंदूंनी कॅनडा सोडावं, त्यांनी भारतात जावं. तुम्ही केवळ भारताचेच समर्थन करत नाही, तर खलिस्तान समर्थक शिखांचे भाषण आणि अभिव्यक्ती दडपण्याचे समर्थन करत आहात. निज्जरच्या हत्येचा आनंद साजरा करून तुम्ही हिंसाचाराला प्रोत्साहन देत आहात, असे पन्नूने म्हटले होते. 

हेही वाचा – ‘या’ महिला अधिकाऱ्याने पाकिस्तानला UN मध्ये खडसावले; ‘मुंबई-26/11 हल्ल्यांतील दोषींवर प्रथम कारवाई करा

गुरपतवंत सिंग पन्नू कोण?

गुरपतवंत सिंग पन्नू हा मूळचा पंजाबमधील खानकोट येथील असून तो सध्या अमेरिकेचा नागरिक आहे. पंजाब विद्यापीठातून कायद्याचे शिक्षण घेऊन पन्नू परदेशात गेला होता. तेव्हापासून तो कॅनडा आणि अमेरिकेत राहतो. परदेशात राहून तो खलिस्तानी कारवाया करत राहतो आणि वेळोवेळी व्हिडीओ जारी करून भारत सरकारविरुद्ध विष पेरण्याचं काम करत असतो. पाकिस्तानी गुप्तचर एजन्सी ISI च्या मदतीने, त्याने शिख फॉर जस्टिस ऑर्गनायझेशन (SFJ) नावाची संघटना देखील स्थापन केली आहे. या संस्थेवर भारताने 2019 मध्ये बंदी घातली होती. भारत तोडण्याची इच्छा बाळगणाऱ्या खलिस्तानी दहशतवादी पन्नूने खलिस्तान समर्थकांसोबत परदेशी भूमीवर अनेकदा भारतविरोधी आंदोलने केली आहेत. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, पन्नू यांची संघटना शिख फॉर जस्टिस पंजाबमधील लोकांना भडकवण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच खलिस्तानच्या मागणीसाठी जगभरात अनेक ठिकाणी निदर्शने करण्यात आल्यामुळे भारताची प्रतिमा मलीन झाली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -