घरताज्या घडामोडीNIA arrests IPS officer : एनआयएकडून आयपीएस अधिकाऱ्याला अटक, लष्कर-ए-तैयबाला माहिती पुरवल्याचा...

NIA arrests IPS officer : एनआयएकडून आयपीएस अधिकाऱ्याला अटक, लष्कर-ए-तैयबाला माहिती पुरवल्याचा आरोप

Subscribe

एनआयएने तपासादरम्यान अधिकारी नेगी यांच्या घरावर छापेमारी केली होती. नेगी यांनी गुप्त कागदपत्रे लिक केली असल्याचे चौकशीमध्ये समोर आले आहे. गुप्त OWG तपासादरम्यान फाईल्स लिक केल्याचे उघडकीस आलं आहे. तसेच

राष्ट्रीय तपास संस्था (NIA) ने शुक्रवारी धडक कारवाई करत दहशतवाद्यांना माहिती पुरवणाऱ्यांना अटक केली आहे. यामध्ये माजी पोलीस अधिक्षक (SP) आणि आयपीएस अधिकारी अरविंद दिग्विजय नेगी यांना अटक करण्यात आले आहे. नेगी यांच्यावर बंदी घातलेल्या लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेला गुप्त माहिती पुरवणे आणि कागदपत्रे लीक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेत नेगी एसपी म्हणून तैनात होते यावेळी सुरु असलेल्या प्रकरणाची माहिती त्यांनी लिक केली आङे.

अरविंद दिग्विजय नेगी हे हिमाच कॅडर २०११ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. एनआयएने गेल्या वर्षी ६ नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यासंदर्भात नेगी यांना अटक करण्यात आली आहे. हे प्रकरण लष्कर-ए-तैयबाचे भारतातील दहशतवादी कारवायांचे नियोजन आणि अंमलबजावणीबाबतचे आहे. या प्रकरणात एनआयने आतापर्यंत एकूण ६ जणांना अटक केली आहे.

- Advertisement -

एनआयएने तपासादरम्यान अधिकारी नेगी यांच्या घरावर छापेमारी केली होती. नेगी यांनी गुप्त कागदपत्रे लिक केली असल्याचे चौकशीमध्ये समोर आले आहे. गुप्त OWG तपासादरम्यान फाईल्स लिक केल्याचे उघडकीस आलं आहे.


ओव्हरग्राउंड कामगारांच्या माध्यमातून या प्रकरणाशी संबंधित अनेक महत्त्वाची माहिती दहशतवादी संघटनेपर्यंत पोहोचल्याचा आरोप आहे. त्यानंतर ही माहिती दहशतवादी संघटनेपर्यंत कशी पोहोचली याचा तपास करण्यात आला. NIA अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, या प्रकरणातील संशयाची सुई आयपीएस अधिकारी अरविंद दिग्विजय नेगी यांच्याकडे गेली, तोपर्यंत नेगीला एजन्सीकडून त्याच्या मूळ कॅडर हिमाचल प्रदेशमध्ये पाठवण्यात आले होते जेथे नेगी एसपी शिमला म्हणून तैनात होते.

- Advertisement -

हेही वाचा : Maharashtra New DGP : रजनीश शेठ राज्याचे नवे पोलीस महासंचालक; पांडे मूळ पदावर

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -