मोठी बातमी! NIA कोर्टाने यासिन मलिकला टेरर फंडिंग प्रकरणात दोषी ठरवले

गेल्या सुनावणीत मोहम्मद यासीन मलिकने दिल्लीतील एनआयए कोर्टात दहशतवादाशी संबंधित त्याच्या सर्व गुन्ह्यांची कबुली दिली होती, त्यानंतर कोर्टाने सुनावणी 19 मेपर्यंत पुढे ढकलली होती. मलिक यानं कोर्टाला सांगितले की, मी माझ्यावरील सर्व आरोप स्वीकारणार आहे.

delhi nia court may sentence yasin malik in kashmir terror funding case today he had pleaded guilty

नवी दिल्लीः दिल्लीतील NIA न्यायालयाने काश्मीरमधील फुटीरतावादी नेता यासिन मलिकला टेरर फंडिंग प्रकरणात दोषी ठरवले आहे. मलिकने स्वतः कोर्टात आपल्या गुन्ह्याची कबुली दिली होती. मलिक याच्यावर दिल्लीच्या NIA उच्च न्यायालयात दहशतवादाशी संबंधित अनेक खटले दाखल आहेत, ज्यात बेकायदेशीर हालचाली प्रतिबंध कायदा (यूएपीए) समाविष्ट आहे. विशेष न्यायाधीश प्रवीण सिंह या खटल्याची सुनावणी करत होते ज्यात त्यांनी मलिकला दोषी ठरवले.

गेल्या सुनावणीत मोहम्मद यासीन मलिकने दिल्लीतील एनआयए कोर्टात दहशतवादाशी संबंधित त्याच्या सर्व गुन्ह्यांची कबुली दिली होती, त्यानंतर कोर्टाने सुनावणी 19 मेपर्यंत पुढे ढकलली होती. मलिक यानं कोर्टाला सांगितले की, मी माझ्यावरील सर्व आरोप स्वीकारणार आहे. त्याला आव्हान देणार नाही. यासीन मलिकवर भारतीय दंड संहितेच्या कलम 16 (दहशतवाद कायदा), कलम 17 (दहशतवादी निधी), कलम 18 (दहशतवाद्यांचा कट रचणे) आणि कलम 20 (दहशतवादी टोळीचा सदस्य) असे आरोप ठेवण्यात आले आहेत. यासोबतच त्याच्यावर UAPA, 120B (गुन्हेगारी कट) आणि 124A (देशद्रोह) देखील लावण्यात आले आहेत.


जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते

मलिकवर लावण्यात आलेल्या कलमांनुसार मलिकला जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते. दरम्यान, विशेष न्यायालयाने काश्मिरी फुटीरतावादी फारुख अहमद दार उर्फ​बिट्टा कराटे, शाबीर शाह, मसरत आलम, मोहम्मद युसूफ शाह, आफताब अहमद शाह, अल्ताफ अहमद शाह, नईम खान, मोहम्मद अकबर खांडे, राजा मेहराजुद्दीन कलवाल, बशीर अहमद बट, जहूर अहमद शहा, वटाली, शाबीर अहमद शाह, अब्दुल रशीद शेख आणि नवलकिशोर कपूर यांच्याविरुद्ध आरोपपत्रे दाखल करून त्यांना अटक करण्याचे आदेश दिले आहेत. लष्कर-ए-तैयबाचा दहशतवादी म्होरक्या हाफिज सईद आणि हिजबुल मुजाहिद्दीनचा सय्यद सलाहुद्दीन यांच्यावरही आरोपपत्र दाखल करण्यात आले होते.


हेही वाचाः …आणि एका रात्रीत ते हिंदुत्ववादी झाले, अयोध्येत जायला निघाले, संजय राऊतांचा राज ठाकरेंना टोला