घरदेश-विदेशJ&K Terror Funding Case: NIA कोर्टाचे हाफिज सईद, यासिन मलिकसह 15 जणांवर...

J&K Terror Funding Case: NIA कोर्टाचे हाफिज सईद, यासिन मलिकसह 15 जणांवर आरोप निश्चित करण्याचे आदेश

Subscribe

टेरर फंडिंग प्रकरणी एनआयए कोर्टाने (Special NIA Court, Delhi) लष्कर- ए- तोयब्बाचा संस्थापक हाफिज सईज आणि हिजबुल मुजाहिदीनचा प्रमुख सय्यद सलाहुद्दीन, जम्मू-काश्मीरमधील फुटीरतावादी नेते यासीन मलिक, शब्बीर शाह, मसरत आलम यांच्यासह 15 जणांविरुद्ध UAPA कलमांतर्गत आरोप निश्चित करण्याचे आदेश दिले आहेत.

यासीन मलिक, शब्बीर शाह, मसरत आलम यांच्यासह 15 जणांवर जम्मू आणि काश्मीरमध्ये अस्वस्थ निर्माण करत दहशतवादी कारवाया करणे, फुटीरतावादी कारवायांना खतपाणी घालणे अशा आरोपांखाली बेकायदेशीर कृती प्रतिबंध कायद्याच्या  (UAPA) विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील यासीन मलिक हा जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंटचा प्रमुख असून त्याच्याविरोधात भारतीय हवाई दलाच्या 4 जवानांच्या हत्येची केसही सुरु आहे.

- Advertisement -

टेरर फंडिंग प्रकरणाच्या सुनावणी करणार्‍या राष्ट्रीय तपास संस्थेच्या विशेष न्यायालयाचे न्यायमूर्ती परवीन सिंग यांनी जम्मू आणि काश्मीरमधील 2017 च्या दहशतवादी आणि फुटीरतावादी कारवायांना “नियोजित कट” म्हणून संबोधले. जस्टिस सिंग यांच्या म्हणण्यानुसार, या कटाचा मास्टरमाईंड सीमेपलीकडे पाकिस्तानमध्ये बसून आयएसआय (Pakistan’s Inter Services Intelligence) च्या इशाऱ्यावर काम करत होता. एनआयए कोर्टाने आपल्या आदेशात म्हटले आहे की, पाकिस्तान आणि त्याच्या एजन्सींनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी मोहिमेसाठी फंडिंगसाठी पैसे पाठवले होते. या मोहिमेचा उपयोग भारतविरोधी योजना राबवण्यासाठी केला जात होता.

रक्तपात, हिंसाचार, विध्वंस घडवून जम्मू-काश्मीरला भारतापासून वेगळे करण्याचा कट रचण्याचा त्यांचा हेतू होता, असे एनआयए न्यायालयाने म्हटले आहे. एका मोठ्या गुन्हेगारी कटाचा भाग म्हणून जम्मू-काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणावर निदर्शने, हिंसक घटना घडल्या. या घटनांनी काश्मीर खोऱ्यात दहशतवादाला प्रोत्साहन देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. या प्रकरणात यासिन मलिक, मसरत आलम, शबीर शाह यांच्यासह लष्कर-ए-तैयबा (एलईटी) संस्थापक हाफिज सईद आणि हिजबुल मुजाहिद्दीनचा प्रमुख सय्यद सलाहुद्दीन यांचा सहभाग होता. एनआयए कोर्टाने म्हटले आहे की, आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यात आलेला आणि २००८ च्या मुंबई बॉम्बस्फोटाचा आरोपी हाफिज सईदने दहशतवादी फंडिंगसाठी भारतात पैसे पाठवले होते.

- Advertisement -

NIA कोर्टाने काय म्हटले?

न्यायालयाने म्हटले की, “आरोपींच्या वतीने असा युक्तिवाद करण्यात आला आहे की, गांधीवादी शांततेने आंदोलन करत होते. मात्र प्रथमदर्शनी पुरावे काही वेगळेच सांगतात. निदर्शने केवळ हिंसाचारासाठी केली नव्हती, तर यातून हिंसचार घडवून आणण्याचा हेतू होता. त्यांची योजना ब्राउनशर्ट्सच्या मार्च, अॅडॉल्फ हिटलर आणि नाझी पक्षाच्या वास्तविक सैन्याप्रमाणेच सरळ आणि स्पष्ट होती. त्यांचा उद्देश सरकारला घाबरवणे आणि बंडखोरीची योजना करणे यापेक्षा भयानक होती. हुर्रियत कॉन्फरन्सने आपला उद्देश पूर्ण करण्यासाठी दहशतवादी संघटनांसोबत कट रचला होता. त्यात हाफिज मुहम्मद सईद, मोहम्मद युसूफ शाह, आफताब अहमद शाह, अल्ताफ अहमद शाह, नईम खान, फारुख अहमद दार, राजा मेहराजुद्दीन कलवाल, बशीर अहमद भट, जहूर अहमद शाह वताली, शब्बीर अहमद शाह, मसरत आलम, अब्दुल रशीद शेख आणि नवल यांचा समावेश होता. किशोर.कपूर यांचा समावेश आहे.

दहशतवादी कारवायांमध्ये यासीन मलिक सामील

यासीन मलिक हा जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंटचा अध्यक्ष आणि पाकिस्तानचा कट्टर फुटीरतावादी नेता आहे. दहशतवादाला पाठिंबा देण्यासाठी आणि काश्मीरमध्ये फुटीरतावादी कारवायांना प्रोत्साहन देण्यासाठी पाकिस्तानसह इतर भारतविरोधी देशांकडून निधी मिळवल्याचा आरोप त्याच्यावर आहे. यासीन मलिकवर 1990 मध्ये जम्मू-काश्मीरमध्ये हिंदूंवर झालेल्या क्रूर हिंसाचाराचा आणि त्यांच्या पलायनाचाही आरोप आहे. जानेवारी 1990 मध्ये हवाई दलाच्या 4 अधिकाऱ्यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती, ज्याचा आरोप यासिन मलिकवर आहे.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -