NIA च्या प्रमुख पदी दिनकर गुप्ता यांची नियुक्ती

पंजाबमध्ये डीजीपी म्हणून काम करताना, दिनकर गुप्ता यांनी त्यांच्या पत्नी विनी महाजन यांच्या हाताखालीही काम केले

nia gets regular chief after a year as dinkar gupta appointed

वरिष्ठ भारतीय पोलीस सेवा (IPS) अधिकारी दिनकर यांची यांची गुरुवारी राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली. केंद्रीय मंत्रालयाने यासंदर्भातील आदेश जारी केला आहे. गुप्ता हे पंजाब केडरचे 1987 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत.

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने गुप्ता यांची NIA चे महासंचालक म्हणून 31 मार्च 2024 पर्यंत म्हणजेच त्यांच्या निवृत्तीच्या तारखेपर्यंत नियुक्तीला मान्यता दिली आहे. अन्य एका आदेशात असे सांगण्यात आले की, स्वागत दास यांची गृह मंत्रालयात विशेष सचिव (अंतर्गत सुरक्षा) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

सीआरपीएफचे महासंचालक गेल्या मे महिन्यापासून एनआयएचा अतिरिक्त कार्यभार सांभाळत होते. मात्र याता पदाची जबाबदारी वरिष्ठ भारतीय पोलीस सेवा (IPS) अधिकारी दिनकर यांच्यावर सोपवण्यात आली आहे.

पोलिस प्रशासनात पदव्युत्तर पदवी घेतलेल्या गुप्ता यांनी 2019 मध्ये पंजाब पोलिस महासंचालक म्हणून पदभार स्वीकारला. दोन वर्षे सात महिने या पदाचं कामकाज त्यांनी सांभाळले. याशिवाय त्यांनी पंजाबमध्ये डीजीपी इंटेलिजन्सचे पदही भूषवले. केंद्रीय प्रतिनियुक्तीसाठी परवानगी मागितल्याने त्यांची पंजाब पोलीस गृहनिर्माण मंडळाचे अध्यक्ष म्हणून बदली करण्यात आली. तसेच त्यांनी पंजाबमधील लुधियाना, जालंधर आणि होशियारपूर जिल्ह्यांचे एसएसपी पद भूषवले होते, या काळात संबंधित जिल्ह्यांमध्ये दहशतवाद ही एक मोठी समस्या म्हणून उदयास येत होती.

दिनकर गुप्ता यांनी यापूर्वी जून 2004 ते जुलै 2012 या कालावधीत केंद्रीय प्रतिनियुक्तीवर आठ वर्षे काम पाहिले. यावेळी त्यांनी व्हीव्हीआयपींची सुरक्षा पाहणाऱ्या इंटेलिजन्स ब्युरोच्या प्रमुखाची जबाबदारी स्वीकारली. पोलीस दलातील विशेष सेवेसाठी दिनकर गुप्ता यांना 1992 आणि 1994 मध्ये दोन पोलीस शौर्य पदके देण्यात आली.

याशिवाय राष्ट्रपतींच्या हस्ते गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदक आणि विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रीय पोलीस पदक (2010) देखील प्रदान करण्यात आले आहे. 1999 मध्ये दिनकर गुप्ता यांना ब्रिटिश कौन्सिलने लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये ब्रिटीश चेवनिंग गुरुकुल शिष्यवृत्ती प्रदान केली.

चन्नी सरकारच्या काळात डीजीपी पदावरून हटवले

पंजाबमध्ये कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या राजीनाम्यानंतर मुख्यमंत्री बनलेल्या चरणजीत सिंग चन्नी यांनी दिनकर गुप्ता यांच्या जागी 1988 च्या बॅचचे अधिकारी इक्बाल प्रीत सिंग सहोता यांच्याकडे डीजीपीची जबाबदारी सोपवली. चन्नी मुख्यमंत्री होताच गुप्ता यांनी महिनाभराच्या रजेवर जाण्याचा निर्णय घेतला तेव्हा हा प्रकार घडला.

पत्नीच्या हाताखालीही केले काम

पंजाबमध्ये डीजीपी म्हणून काम करताना, दिनकर गुप्ता यांनी त्यांच्या पत्नी विनी महाजन यांच्या हाताखालीही काम केले. कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या सरकारने राज्याच्या मुख्य सचिवपदी विनी महाजन यांची नियुक्ती केली होती. हाही तो काळ होता जेव्हा पंजाबच्या महत्त्वाच्या पदांच्या जबाबदाऱ्या पती-पत्नी दोघांच्याही खांद्यावर होत्या. त्यामुळे दिनकर गुप्ता यांना त्यांच्या पत्नी मुख्य सचिव विनी महाजन यांच्या हाताखाली काम करावे लागले. विनी महाजन याही दिनकर गुप्ता यांच्याप्रमाणेच 1987 च्या बॅचच्या आयएएस अधिकारी आहेत. मुख्यमंत्री चरणजित सिंह चन्नी यांनी त्यांना मुख्य सचिव पदावरून हटवले.


शिवसेनेच्या 16 बंडखोर आमदारांना अपात्रतेची नोटीस, मत मांडण्यासाठी दिला 48 तासांचा अल्टिमेटम