NIA Raids : नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी (NIA) ने आज (13 ऑगस्ट) महाराष्ट्रासह (Maharashtra) पाच राज्यांमध्ये पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) शी संबंधित ठिकाणांवर छापेमारी केली आहे. यावेळी एनआयए एजन्सीने अनेक गुन्हेगारी डिजिटल उपकरणांसह कागदपत्रेही जप्त केली. एनआयएच्या एका अधिकाऱ्याने यासंबंधी माहिती दिली आहे. (NIA raids on PFI hideouts in five states including Maharashtra)
अधिकाऱ्याने सांगितले की, एनआयएने आज केर, कर्नाटक, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल आणि बिहार राज्यातील कन्नूर, मलप्पुरम, दक्षिण कन्नड, नाशिक, कोल्हापूर, मुर्शिदाबाद आणि कटिहार या जिल्ह्यांतील एकूण 14 ठिकाणी छापे टाकले आहेत. भारतातील शांतता आणि सांप्रदायिक सलोखा बिघडवण्याचा पीएफआयचा कट उघड करण्याच्या उद्देशाने ही छापेमारी करण्यात आली. यावेळी कागदपत्रांसह अनेक डिजिटल उपकरण जप्त करण्यात आले आहेत. दहशतवाद, हिंसाचार आणि विध्वंसाच्या कृत्यांमधून 2047 पर्यंत भारतात मुस्लिम विधारधारा प्रस्थापित करण्यासाठी आणि सशस्त्र सैन्य तयार करण्यासाठी पीएफआयकडून प्रयत्न सुरू आहेत. परंतु त्यांचे प्रयत्न हाणून पाडण्यासाठी एनआयएन काम करत आहेत.
National Investigation Agency (NIA) today conducted a series of raids and searches across five states on premises related to the Popular Front of India (PFI). A total of 14 locations in Kannur, Malappuram, Dakshin Kannada, Nashik, Kolhapur, Murshidabad and Katihar districts of…
— ANI (@ANI) August 13, 2023
हेही वाचा – Kerala : शालेय अभ्यासक्रमात गांधी हत्या आणि गुजरात दंगलींसारखे विषय पुन्हा जोडले
विविध राज्यांमध्ये शस्त्र प्रशिक्षण शिबिरे?
अधिकाऱ्याने सांगितले की, भारताविरोधी अजेंडा पुढे पीएफआय समाजातील काही घटकांविरुद्ध लढा देऊन तरुणांना कट्टरपंथी बनवण्याचा आणि शस्त्र प्रशिक्षण प्रदान करण्याचा कट रचत आहे. पीएफआयचे अनेक मध्यमस्तरीय एजंट मास्टर ट्रेनर म्हणून काम करत आहेत आणि त्यांच्या उच्च कट्टरपंथी केडरसाठी विविध राज्यांमध्ये शस्त्र प्रशिक्षण शिबिरे आयोजित करत आहेत, अशा संशय एनआयए एजन्सीला आहे.
हेही वाचा – यूएईच्या अंतराळवीराने टिपले हिमालयाचे अनोखे छायाचित्र, सोशल मीडियावर व्हायरल
एनआयएकडून विविध राज्यांमध्ये अनेक ठिकाणी छापे
एनआयए गेल्या अनेक महिन्यांपासून या केडर, कार्यकर्त्यांना ओळखण्यासाठी आणि त्यांना अटक करण्यासाठी विविध राज्यांमध्ये अनेक ठिकाणी छापे टाकले आहेत. एनआयएने गेल्या वर्षी एप्रिलमध्ये पीएफआयविरुद्ध गुन्हा दाखल केला होता आणि देशव्यापी मोहिमेअंतर्गत सप्टेंबर 2022 मध्ये डझनभर राष्ट्रीय कार्यकारी परिषदेच्या सदस्यांसह अनेक प्रमुख नेत्यांना अटक केली आहे.