घरदेश-विदेशदेशभरातील गँगस्टर्सविरोधात एनआयए सक्रिय; 60 ठिकाणी केली छापेमारी

देशभरातील गँगस्टर्सविरोधात एनआयए सक्रिय; 60 ठिकाणी केली छापेमारी

Subscribe

पंजाबमधील काही गँगस्टर्सचे खलिस्तानी दहशतवादी आणि आयएसआयशी संबंध असल्याचेही समोर आले आहे. यामुळे सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत

देशातील संघटीत दहशतवादी गट आणि गँगस्टर्सना लगाम घालण्यासाठी एनआयए सक्रिय झाली आहे. एजन्सीने उत्तर भारतातील सुमारे 60 ठिकाणी छापेमारी केली आहे. नार्को टेररिज्म, शस्त्रास्त्रांची तस्करी आणि टोळी युद्धाला (गँगवॉर) आळा घालण्यासाठी ही कारवाई करण्यात आली आहे. एनआयए सुत्रांच्या माहितीनुसार, देशातील बेकायदेशीर कारवायांना आळा घालण्यासाठी ही शोध मोहीम सुरु करण्यात आली आहे. या दहशतवाद समर्थक

एजन्सीने उत्तर भारतातील सुमारे 60 ठिकाणी छापे टाकले आहेत. नार्को टेररिज्म, शस्त्रास्त्रांची तस्करी आणि टोळीयुद्धाला आळा घालण्यासाठी ही कारवाई करण्यात आली आहे.एनआयएच्या सूत्रांनी सांगितले की, बेकायदेशीर कारवायांना आळा घालण्यासाठी ही छापेमारी मोहीम सुरू करण्यात आली आहे. देशात अवैधरित्या घापपात घडवून आणण्यासाठी या दहशतवादी संघटना काम करत असल्याचा एनआयएला संशय आहे..यामुळे एनआयएने दिल्ली-एनसीआर, हरियाणा, पंजाब, राजस्थान आणि पश्चिम उत्तर प्रदेशात अनेक ठिकाणी छापेमारी केली आहे.

- Advertisement -

एजन्सीच्या म्हणण्यानुसार, काही टॉप गँग एनआयएच्या रडारवर आहेत, या गँग भारतातून ऑपरेट होत असून यातील गँगस्टर्स परदेशातून दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन देण्याचे काम करत आहेत. नुकतीच एनआयएने हरियाणा आणि पंजाबच्या पोलिस अधिकाऱ्यांची बैठक घेतली.यानंतर एनआयएने दिल्ली-एनसीआर, हरियाणा, पंजाब.राजस्थान आणि पश्चिम उत्तर प्रदेशात अनेक ठिकाणी छापेमारी केली. अलीकडेच एनआयएने नीरज बवाना गँग, लॉरेन्स बिश्नोई गँगसह 10 गँगस्टर्सविरोधात तपास सुरू केला आहे. पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाच्या हत्येत फक्त लॉरेन्स बिश्नोई गँगचाच हात असल्याचं म्हटलं जात आहे.

पंजाबमधील काही गँगस्टर्सचे खलिस्तानी दहशतवादी आणि आयएसआयशी संबंध असल्याचेही समोर आले आहे. यामुळे सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. एनआयएने यापूर्वी नीरज बवाना, लॉरेन्स बिश्नोई आणि टिल्लू ताजपुरिया यांच्यासह अनेक प्रसिद्ध गँगस्टर्सची यादी तयार केली होती. हे गँगस्टर्स दिल्ली, हरियाणा, पंजाबसह अनेक राज्यांतून आपले नेटवर्क चालवत होते. एवढेच नाही तर यातील अनेक गँगस्टर्स कारागृहातूनही सक्रिय झाले आहेत .सिद्धू मुसेवालाची हत्याही गँगस्टर्सच्या परस्पर वैमनस्यातूनचं झाल्याची माहिती समोर आली आहे.

- Advertisement -

एनआयएने ज्या गँगवर कारवाई केली त्यामध्ये कॅनडातून चालवली जाणाऱ्या गोल्डी ब्रार आणि लॉरेन्स बिश्नोई गँगचा समावेश आहे. याशिवाय नीरज बवाना, देविंदर बंबीहा, कौशल चौधरी, टिल्लू ताजपुरिया, दिलप्रीत आणि सुखप्रीत गँगचा समावेश आहे. याशिवाय फरार दहशतवादी हरविंदर रिंडा याच्या सिंडिकेटवरही नियंत्रण ठेवण्यात आले आहे. हरविंदर रिंडा दिल्ली, पंजाब, हरियाणा आणि राजस्थानमध्ये आपले सिंडिकेट चालवत असल्याचा आरोप आहे.


राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट! राष्ट्रीय अधिवेशनादरम्यान अजित पवार मंचावरून गेले निघून

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -