घरक्राइमदिल्लीच्या बाटला हाऊस प्रकरणी NIA ची मोठी कारवाई; ISIS संबंधित मोहसिन अहमदला...

दिल्लीच्या बाटला हाऊस प्रकरणी NIA ची मोठी कारवाई; ISIS संबंधित मोहसिन अहमदला अटक

Subscribe

राष्ट्रीय तपास यंत्रणेने दिल्लीतील बाटला हाऊसप्रकरणी छापा टाकून ISIS च्या सक्रिय सदस्याला अटक केली आहे. मोहसीन अहमद असे या दहशतवाद्याचे नाव आहे. जो क्रिप्टोकरन्सीच्या मदतीने दहशतवाद्यांना आर्थिक मदत करत होते. एनआयएने रविवारी 6 ठिकाणी छापेमारी करत त्यांना या दहशतवाद्याला अटक करण्यात यश मिळाले आहे.

स्वातंत्रय्य दिनाच्या अगोदर राष्ट्रीय तपास संस्थेने दिल्लीत शोध मोहिम सुरु केली. यावेळी आयएसआयएस मॉड्यूलच्या दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असलेल्या एका आरोपीला अटक केली आहे. मोहसीन अहमद असे या आरोपीचे नाव असून तो बाटला हाऊस नवी दिल्ली येथे राहणार आहे.

- Advertisement -

मोहसीन अहमद आजूबाजूच्या लोकांवर नजर ठेवत होता, जेव्हा जेव्हा त्याला संधी मिळली तेव्हा त्याने लोकांची माथी भडकवण्याचा प्रयत्न केला. मात्र अद्याप फारशी माहिती मिळालेली नाही, मात्र अटकेनंतर मोहसीन अहमदचा पुढील प्लॅन काय होता हे जाणून घेण्याचा प्रयत्न तपास यंत्रणांकडून केला जात आहे.

 

- Advertisement -


दिल्लीच्या जामिया मिलिया युनिव्हर्सिटीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी मोहसीनबद्दल दिलेल्या माहितीच्या आधारे तपास यंत्रणेने ही कारवाई केली. विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार, त्याने इस्लामिक स्टेटच्या विचारसरणीने अनेक विद्यार्थ्यांना प्रभावित करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी तपास यंत्रणेने 25 जून रोजीच मोहसीनविरोधात गुन्हा दाखल केला होता, त्यानंतर त्याचा सतत शोध सुरू होता.

आरोपी अफगाणिस्तान आणि सीरियातील आयएसआयएस कमांडरच्या संपर्कात होता आणि क्रिप्टोकरन्सीद्वारे त्यांना निधी पाठवत होता, असे तपासात समोर आले आहे. मोहसीन अहमद भारतातून ISIS साठी फंडिंग गोळा करत होता अशी माहिती NIA अधिकाऱ्यांनी दिली आहे. क्रिप्टोकरन्सी आणि हवालाद्वारे केलेल्या व्यवहारांना कोणी निधी दिला हे तपास यंत्रणा आता शोधत आहे. तसेच त्याचा हँडलर कोण आहे आणि तो कुठे बसला आहे? पुढे तो कुठे पैसे पुरवत होता? पैसे कोणाकडे पाठवले जात होते? याचा तपासही तपास यंत्रणांकडून केला जात आहे.


ईपीएफओच्या २८ कोटी खातेधारकांची माहिती लीक, तुमचंही यादीत नाव नाही ना?


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -