घरदेश-विदेशपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पुतणीची पर्स चोरीला

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पुतणीची पर्स चोरीला

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुतणीची पर्स चोरीला गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे चोरट्याने त्यांच्या हातातील पर्स हिसकावली आणि तेथून धूम ठोकली. ही घटना दिल्लीतील एका उच्चभ्रू सोसायटीत घडली. या पर्समध्ये महत्त्वाची कागदपत्रे आणि रोख रक्कमही होती. याशिवाय या घटनेनंतर महिला सुरक्षिततेवर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाला आहे. राजधानी दिल्लीत अशाप्रकारची घटना घडणे हे धक्कादायक आहे, अशी प्रतिक्रिया सर्वसामान्यांमधून येत आहेत.

काय आहे नेमके प्रकरण?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुतणी दमयंती बेन मोदी आज म्हणजे मंगळवारी सकाळी अमृतसर येथून दिल्लीला आल्या. त्या दिल्लीच्या सिव्हील लाइन्स परिसरातील गुजरात भवन येथे जात होत्या. दिल्ली रेल्वे स्थानक येथून त्या रिक्षाने गुजरात भवन येथे आल्या. यावेळी रिक्षा खाली उतरत असतानाच दोन तरुण बाईकवर आले आणि त्यांनी त्यांच्या हातातील पर्स खेचून घेतली आणि तेथून पसार झाले. दमयंती बेन यांना थोड्या क्षणांसाठी काय झाले ते कळलेच नाही. त्यांना या गोष्टीचा धक्काच बसला. त्यांनी ताबोडतोब परिसरातील पोलीस ठाणे गाठून तक्रार केली.

- Advertisement -

पर्समध्ये होती ५६ हजारांची रक्कम

पर्समध्ये महत्त्वाची कागदपत्रे आणि ५६ हजार रुपयांची रोख रक्कम होती. याशिवाय त्यात दोन मोबाईलही होते, अशी माहिती दमयंती बेन यांनी दिली. त्या आज संध्याकाळी अहमदाबाद फ्लाइटने जाणार होत्या. मात्र, त्यांचे महत्त्वाचे कागदपत्रे हरवली आहेत. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

एक प्रतिक्रिया

  1. ज्या वेळी सर्व हातात होतं तेंव्हा शेपूट घालून बसलात नी आता सिंहांचा आव…..

टिप्पण्या बंद आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -