घरदेश-विदेशभयंकर! चक्क शूजमध्येच मानवी रक्ताचा वापर

भयंकर! चक्क शूजमध्येच मानवी रक्ताचा वापर

Subscribe

कंपन्या आपला ब्रँड बाजारात टिकवून ठेवण्यासाठी नवनवीन आयडिया वापरत असतात. यातच अमेरिका ब्रूकलिनमधील एमएससीएचएफ ( MSCHF) प्रँक कंपनीने चक्क ‘सॅटन शूज’मध्ये मानवी रक्ताचा वापर केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अमेरिकेचा प्रसिद्ध रॅपर लिल नास याने एससीएचएफशी करार करत ‘सॅटन शूज’ची जाहिरात केली आहे. त्यामध्ये तो ६६६ क्रमांकाचे बुट मिळाल्याचे दाखवत आहे. Nike कंपनीच्या ‘एअर मॅक्स ९७’ या शुजचा वापर करत एमएससीएचएफ कंपनीने सॅटन शुज तयार केले. या शुजच्या प्रत्येक जोडीतील एअरबबल भरण्यासाठी कंपनीने एक थेंब रक्त आणि शाईचे मिश्रण वापरले आहे. हे काळे आणि लाल रंगाचे स्निकर्स सॅटन शुज लाँच केले असा दावा केला जात आहे. मात्र हे ‘सॅटन शूज’ तयार करताना एससीएचए या कंपनीने Nike ची परवानगी घेतली नसून या प्रोजेक्टबाबतही कुठलीही माहिती दिली नसल्याने या कंपनीवर कारवाई करावी अशी मागणी Nike ने केली आहे. तसेच ‘एमएससीएचएफ’ या बूट उत्पादक कंपनीविरोधात न्यूयॉर्कमधील कोर्टात खटला दाखल केला आहे. मात्र या खटल्यात रॅपर लिलचे नाव घेण्यात आलेले नाही.

- Advertisement -

परंतु सॅटन शूज किंवा सॅटन म्हणजे नेमके काय असे प्रश्न तुम्हाला पडला असले, तर सॅटन म्हणजे मुस्लिम, ख्रिश्चन ज्यु धर्मग्रंथानुसार वाईट, दुष्ट शक्तींचे प्रतीक किंवा राक्षसी, सैतान वृत्ती. याच संकल्पनेचा आधार घेत हे सॅटन शूज एमएससीएचएफ कंपनीने तयार केले. सोमवारी जेव्हा हे शूज ऑनलाइन लाँच झाले तेव्हा 1 हजार 18 डॉलरना एक जोडी म्हणजे ७५ हजार रुपये किंमतीला हे शुज एका मिनिटात विकले गेले असा दावा केला जात आहे.

यावर आता Nike कंपनीने आक्रमक भूमिका घेत स्पष्टीकरण दिले आहे. हे शूज तयार करण्यासाठी nike कंपनीचे शूज वापरण्यात आल्याची पूर्वकल्पना नव्हती. या शूजवर Swoosh चे चिन्ह आहे. तसेच या शूजवर Nike कंपनीच्या लोगोही थोड्या वेगळ्या पद्धतीने वापराला आहे. nike ने या प्रकराच्या कुठल्याही कंपनीला शूज बनवण्याची परवानगी दिली नसल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच बुटांच्या आलेल्या ऑर्डरची विक्री एमएससीएचएफ कंपनीने तातडीने थांबवाव्या आणि कंपनीच्या झालेल्या अब्रुनुकसानीसंबंधी खटल्याची सुनावणी करावी असं Nike ने म्हटलं आहे

- Advertisement -

दरम्यान सोशल मिडियावरही या शुजवरून चर्चा रंगू लागल्या आहेत. दरम्यान या शूजवर बायबलच्या ल्यूक १०.१८ चा वापर करण्यात आला आहे. परंतु असे करणे म्हणजे देवाचा अपमान करणे असे यूजर्स म्हणत आहेत. या शूजला सोशल मीडियावर ट्रोल्स केले जात आहे. तसेच कंपनीवरही अनेक आरोप केले जात आहेत. या कंपनीवर या पूर्वीही एका शूजच्या पॅर्टनवरून वाद ओढावून घेतला होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by MSCHF (@mschf)


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -