घरक्राइमनिक्की हत्याप्रकरणातील आरोपी साहिलकडून पोलिसांची दिशाभूल, हत्येची वेळ सांगितली चुकीची

निक्की हत्याप्रकरणातील आरोपी साहिलकडून पोलिसांची दिशाभूल, हत्येची वेळ सांगितली चुकीची

Subscribe

दिल्लीतील निक्की हत्याप्रकरणातील आरोपी साहिलकडून पोलासांची दिशाभूल केली जात आहे. अशात या हत्याप्रकरणातील पोलीस तपास आणि सीसीटीव्ही फुटेजमधून एक मोठा खुलासा झाला आहे. आत्तापर्यंतच्या तपासात हत्येच्या वेळेबाबत आरोपीकडून सातत्याने दिशाभूल केली जात असल्याचा खुलासा झाला आहे.

आरोपी साहिलने 10 फेब्रुवारी रोजी पहाटे 4.00 वाजता नाहीत तर सकाळी 10:00 ते 11:00 दरम्यान ISBT काश्मिरी गेट येथे हत्या केली. तपासातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपीची गाडी जाताना दिसत आहे, असा खुलासा पोलिसांनी केला आहे.

- Advertisement -

मात्र आरोपी आत्तापर्यंत पोलिसांची दिशाभूल करत होता की, त्याने निक्कीची हत्या पहाटे 4 वाजता केली. परंतु पोलिसांना आत्तापर्यंत अनेक व्हिडीओ मिळाले आहेत, ज्यांचा अभ्यास सुरु आहे. आत्तापर्यंतच्या पोलीस तपासात निष्पन्न झाले की, आरोपी जेव्हा उत्तम नगर येथील निकीच्या घरी पोहोचला तेव्हा त्याने त्याचा मोबाइल बंद केला, त्यानंतर त्याचा मोबाइल पूर्णवेळ बंद होता.

साहिलने सकाळी 6.00 वाजता निकीच्या घरातून बाहेर पडला आणि नंतर तो निजामुद्दीन, आनंद विहार ISBT आणि नंतर कश्मीरे गेट ISBTय येथे गेला. दरम्यान साहिलने निक्कीचा मृतदेह फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर त्याने घरी जाऊन मोबाईल ऑन केला. निक्कीच्या हत्येनंतर आरोपीने तिचा फोनही बंद केला होता. काश्मिरी गेटवरचं पोलिसांना आरोपी आणि निकीच्या मोबाईलचे लोकेशन सापडले आहे.

- Advertisement -

दिल्लीमधील या घटनेतील आरोपीने तरुणीची हत्या करून तिचा मृतदेह फ्रिजमध्ये ठेवला. साहिल गेहलोत असे याप्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. दक्षिण-पश्चिम दिल्लीमधील नजफगढ येथे सदर घटना घडली. दोन-तीन दिवसांपूर्वी या घटनेत महिलेची हत्या करून तिचा मृतदेह ढाब्याच्या फ्रिजमध्ये ठेवल्याची माहिती दिल्ली पोलिसांकडून देण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मूळची हरियाणा येथील रहिवासी असलेली निक्की यादव बेपत्ता झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यानंतर पोलिसांनी याबाबत अधिक तपास केला असता, पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे निक्कीची हत्या झाल्याचे उघड झाले. यानंतर पोलिसांनी आरोपी साहिल गेहलोत याच्या धाब्यावर जाऊन तेथील फ्रिजमधून तिचा मृतदेह बाहेर काढला.

नेमकी घटना काय?

आरोपी साहिल आणि निक्की यादव हे दोघेही गेल्या काही वर्षांपासून नात्यात होते. परंतु मागील वर्षी डिसेंबर महिन्यात साहिलच्या घरच्यांनी त्याचे लग्न ठरवले. या लग्नाला निक्कीने विरोध करत यामध्ये आडकाठी आणण्याचा प्रयत्न केला. पण यामुळे संतापलेल्या साहिलने भेटायच्या निमित्ताने तिला ९ फेब्रुवारीला बोलावून घेतले. याचवेळी या दोघांमधील वाद विकोपाला गेला. ज्यानंतर साहिलने तिची हत्या केली. धक्कादायक बाब म्हणजे निक्कीची हत्या करून तिचा मृतदेह फ्रिजमध्ये लपवून साहिलने ९ तारखेला साखरपुडा आणि १० तारखेला लग्नसुद्धा उरकले. पण या घटनेचा कोणालाही सुगावा लागू दिला नाही.


हेही वाचा : मावळते राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे प्रगती पुस्तक पाहिले का ?; मिळाले ‘इतके’ गुण


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -