घरदेश-विदेशस्वीडिश पंतप्रधानांच्या सल्लागारपदी नीला विखे पाटील

स्वीडिश पंतप्रधानांच्या सल्लागारपदी नीला विखे पाटील

Subscribe

स्वीडन या देशाच्या पंतप्रधान कार्यालयात सल्लागारपदी भारतीय वंशाच्या नीला विखे पाटील यांची नियुक्ती झाली आहे.

स्वीडन या देशाच्या पंतप्रधान कार्यालयात सल्लागारपदी भारतीय वंशाच्या नीला विखे पाटील यांची नियुक्ती झाली आहे. गेल्या महिन्यात स्वीडनच्या पंतप्रधान पदाचा कार्यभार हाती घेतलेले सोशल डेमोक्रॅटिक पार्टी- ग्रीन पार्टी या पक्षांच्या आघाडीचे नेते स्टीफन लोफवन यांच्यासोबत त्या काम करतील. नीला विखे पाटील (वय ३२) या सुप्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ अशोक विखे पाटील यांच्या कन्या आहेत. स्वीडनची राजधानी स्टॉकहोमच्या महापालिकेवरही नीला या निवडून गेल्या आहेत.

वाचा – निवडणुकांनंतर RSS राम मंदिर बांधणारच – मोहन भागवत

- Advertisement -

नीला हिची स्वीडनच्या पंतप्रधान कार्यालयात अर्थ विभागाची राजकीय सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली असून कर, अर्थसंकल्प, वित्तीय बाजार आणि घरबांधणी या संदर्भात ती काम करेल. स्वीडनमधील याआधीच्या सरकारच्या कारकिर्दीतही नीला विखे पाटील या पंतप्रधान कार्यालयाच्या राजकीय सल्लागार होत्या. स्वीडनमधील ग्रीन पार्टीच्या सक्रिय सदस्य असलेल्या नीला या पक्षाच्या विविध संघटनांमध्ये कार्यरत असून स्टॉकहोम विभागाच्या निवडणूक समितीमध्ये सदस्य आहेत.
– अशोक विखे पाटील (नीला यांचे वडील)

महराष्ट्रातील राजकीय परिवारातील कन्या 

स्वीडनमध्ये जन्मलेल्या नीला विखे पाटील यांनी सुरुवातीची काही वर्ष भारतात वास्तव्य केले. माजी केंद्रीय मंत्री बाळासाहेब विखे पाटील यांच्या त्या नात असून महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते बाळासाहेब विखे पाटील यांची त्या पुतणी आहेत. नीला यांनी पदवीनंतर गॉथेनबर्ग स्कूल ऑफ बिझनेसमधून इकॉनॉमिक्स आणि लॉ या विषयांसह एमबीए केले असून माद्रीदमधील कॉम्प्ल्यूटन्स विद्यापीठातूनही एमबीए केले आहे.

- Advertisement -

वाचा – क्रिप्टोकरन्सी सीईओचा मृत्यू, अब्जावधी अडकले

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -