घरताज्या घडामोडीमालदिवमध्ये भीषण आग; 9 भारतीयांचा होरपळून मृत्यू

मालदिवमध्ये भीषण आग; 9 भारतीयांचा होरपळून मृत्यू

Subscribe

मालदिवची राजधानी माले येथे गुरुवारी विदेशी कामगारांच्या घरांना भीषण आग लागली. या आगीत 9 भारतीयांचा मृत्यू झाला आहे. तसेच अनेक जण जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे.

मालदिवची राजधानी माले येथे गुरुवारी विदेशी कामगारांच्या घरांना भीषण आग लागली. या आगीत 9 भारतीयांचा मृत्यू झाला आहे. तसेच अनेक जण जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. मालदिवमधील भारतीय दूतांकडूनही याबाबतचे एक ट्वीट करण्यात आले असून त्यांनी मदतीसाठी फोन नंबरही दिले आहेत. (Nine Indians Among 10 Killed In Fire In Maldives)

मिळालेल्या माहितीनुसार, इमारतीच्या तळमजल्यावर असलेल्या कार गॅरेजमध्ये भीषण आग लागली. काही वेळात आगीने रौद्र रूप धारण केले. आगीवर नियंत्रण मिळवल्यानंतर इमारतीच्या वरील मजल्यावर 10 जणांचे मृतदेह आढळून आले. आगीत एकूण 10 जणांचा मृत्यू झाला. या 10 जणांमध्ये 9 भारतीयांचा समावेश आहे. मालदिवची राजधानी माले येथे गुरुवारी परदेशी कामगारांच्या घरांना आग लागली. या आगीचे कारण अद्यापही अस्पष्ट आहे.

- Advertisement -

या घटनेनंतर अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या इमारतीला आग लागली होती. तेथून 10 मृतदेह बाहेर काढण्यात आले असून, यातील नऊ जण हे भारतीय तर एक बांग्लादेश येथील आहे.

या घटनेनंतर मालदीव येथील भारतीय दुतावासाने माले येथील दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांबाबत दुःख व्यक्त केले आहे. तसेच आम्ही मालदीव येथील अधिकाऱ्यांच्या संपर्कात असून, नागरिकांनी कोणत्याही प्रकारच्या मदतीसाठी +९६०७३६१४५२ आणि +९६०७७९०७०१ या नंबरवर संपर्क करण्याचे आवाहन केले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – माजी मंत्री सुशीलकुमार शिंदे ‘भारत जोडो यात्रे’त 11 किलोमीटर चालले; विरोधकांमध्ये चर्चांना उधाण

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -