घरदेश-विदेशजमीन खचल्याने मणिपूरयेथे ९ जणांचा मृत्यू

जमीन खचल्याने मणिपूरयेथे ९ जणांचा मृत्यू

Subscribe

या घटनेत ८ मुले आणि १ महिलेचा मृत्यू झाला आहे. यापूर्वी ऑगस्ट २०१५ ला आलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे २० जणांचा झाला होता मृत्यू.

मुसळधार पाऊसात जमीन खचल्यामुळे ९ जणांचा मृत्यू झाला असल्याची घटना मणिपूर येथे घडली आहे. मयतांमध्ये ८ मुले आणि १ महिलेचा समावेश आहे. मणिपूरच्या तेंगलांग्ज जिल्ह्यात आज सकाळी ही घटना घडली. सध्या ढिगारा हटवण्याचे काम सुरु असून अद्याप दोघांमुलांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आले आहे. रात्री २ ते ३ दरम्यान जमीन खचण्यास सुरुवात झाली. नागालँड आणि मणिपूर राज्यांमध्ये हा जिल्हा असून इंफाळ पासून १५० किमी अंतरावर हा जिल्हा आहे. जिल्ह्यात तीन ठिकाणी जमीन खचली आहे. मयत ८ मुले १८ वर्षा खालील असून मयत महिला ही यापैकी एका मुलाची आई आहे. मुले गाढ झोपेत असताना हा प्रकार घडल्याने ही मुले बेसावध होती.

जिल्ह्यात तीन वेग वेगळ्या ठिकाणची जमिन खचली आहे. निगलॉंग परिसरातही जमिन खचल्याने एका महिलेचा मृत्यू झाला आहे. या महिलेची ओळख पटली असून तिचे नाव मेईजिंगलालली पमेली(३३) आहे. याच परिसरात राहणारी काइथयनँग रीइमी (४४) यांच्या तीन मुली आणि मुलाचाही मृत्यू झाला. लन्थेलंग कामी (४०) आणि तीची ३ वर्षीय मुलीचा मृतदेह ढिगाऱ्या खालून काढण्यात यश आले असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. घटनेनंतर शासनाकडून अद्याप कोणत्याही मदतीची घोषणा केलेले नाही. बचाव कार्य सुरु असल्याचे ट्विट राज्याचे मुख्यमंत्री एन.बिरेन सिंग यांनी केले आहे.

- Advertisement -

“राज्यात तीन ठिकाणी जमीन खचल्यामुळे ९ जणांना आपले प्राण गमवावे लागले ही अत्यंत दुःखत घटना आहे. प्रशासनाकडून शक्यती मदत केली जात आहे”- मुख्यमंत्री एन.बिरेन सिंग

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -