Eco friendly bappa Competition
घर देश-विदेश फसवणूक आणि लुच्चेगिरीची नऊ वर्षे... ठाकरे गटाची मोदी सरकारवर कडाडून टीका

फसवणूक आणि लुच्चेगिरीची नऊ वर्षे… ठाकरे गटाची मोदी सरकारवर कडाडून टीका

Subscribe

मुंबई : चार महिन्यांपूर्वी पुण्यातील कसब्यात भाजपचा गड ‘इंडिया’ गटाच्या काँग्रेसने जिंकला. महाराष्ट्रात पुणे, चंद्रपूर या दोन लोकसभा रिकाम्या आहेत. पण तेथे निवडणूक घेण्याची हिंमत भाजपा प्रायोजित निवडणूक आयोगात नाही. कारण लोकांत पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांच्या सरकारविरोधात संताप आहे. फसवणूक व लुच्चेगिरीची नऊ वर्षे देशाच्या नाकीनऊ आणणारी ठरली. लोक आता फसवणूक करून घ्यायला तयार नाहीत, अशी जोरदार टीका ठाकरे गटाने केली आहे.

हेही वाचा – पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जग जिंकले; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

- Advertisement -

भाजपाने ज्या तीन जागा जिंकल्या, त्यातील दोन जागा एकट्या त्रिपुरातील आहेत आणि एक उत्तराखंडातील. राष्ट्रीय राजकारणाच्या दृष्टीने ही लहान राज्ये आहेत, पण उत्तर प्रदेश, झारखंड, केरळ, प. बंगालचा कौल हा देशाचे वारे कोणत्या दिशेने वाहत आहेत ते दर्शविणारे आहे. आज वारे वाहत आहेत. येणाऱ्या तुफानाची ही सुरुवात आहे, असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मुखपत्र असलेल्या सामना दैनिकातील अग्रलेखातून देण्यात आला आहे.

उत्तर प्रदेशात भाजपाला फटका बसणार
सत्ता पक्षाने पोटनिवडणुकांच्या आधी ‘इंडिया’वर फुली मारून ‘भारत’चा नारा दिला. तरीही घोसीत ‘इंडिया’चा विजय झाला. एकीत बळ आहे व ते घोसीतल्या विजयाने सिद्ध केले. उत्तर प्रदेशात या वेळी मोठा चमत्कार घडेल असे वातावरण आहे. सपा, काँग्रेस एकत्र आहे. मायावतींचे शेवटपर्यंत तळ्यात-मळ्यात आहे. ईडी, सीबीआय चालवणारे कोणते सरकार येत आहे हा अंदाज घेऊन त्या निर्णय घेतील. पण कोणी कितीही आडमुठे धोरण स्वीकारले तरी उत्तर प्रदेशात या वेळी भाजपास मोठा फटका बसेल, असे भाकित ठाकरे गटाने वर्तविले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – G-20 ची बैठक अनेक समस्यांवर मार्ग काढण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरली; जो बायडननी केले भारताचे कौतुक

पहिली चाचणी ‘इंडिया’ पास झाली
जागतिक महाशक्ती आपण बनतोच आहोत, अशी हवा पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांचे प्रचारक निर्माण करीत आहेत. पण सहा राज्यांतील सात विधानसभा पोटनिवडणुकांच्या निकालाने ही ‘हवा’ काढून घेतली. जगात महाशक्ती व स्वदेशात राजकीय शक्तिपात असे चित्र आता स्पष्ट झाले. सात विधानसभा पोटनिवडणुकांत ‘इंडिया’ आघाडीस चार तर मोदीप्रणीत एनडीएला तीन जागा मिळाल्या. या तीनपैकी दोन जागा त्रिपुरा राज्यातल्या आहेत. 27 पक्षांच्या ‘इंडिया’ आघाडीची ही पहिली चाचणी परीक्षा होती व त्या परीक्षेत ती पास झाली आहे, असे या अग्रलेखात म्हटले आहे.

हेही वाचा – जीवाला तुझी आस गा लागली… बंधन दूर होताच गणेशमूर्तीने घेतले विराट रूप

मोदींच्या लोकप्रियतेला उतरती कळा
उत्तर प्रदेशातील (घोसी), उत्तराखंड (बागेश्वर), झारखंड (डुमरी), प. बंगाल (धुपगुडी), धनपूर, बॉक्सानगर (त्रिपुरा), केरळ (पुथुपल्ली) अशा या निवडणुका झाल्या. त्रिपुरा, उत्तराखंडात भाजपाची सरकारे आहेत. त्यामुळे तीन जागा त्याने जिंकल्या. मोदींची लोकप्रियता जागतिक पातळीवर वाढली वगैरे ठीक आहे, पण इकडे स्वदेशात त्यांच्या लोकप्रियतेला उतरती कळा लागली हे निवडणूक निकालाने स्पष्ट झाले, अशी खोचक टीकाही ठाकरे गटाने केली आहे.

- Advertisment -