घरदेश-विदेशNinth Anniversary of Modi Govt : 45 केंद्रांवर होणार पाचवा रोजगार मेळावा

Ninth Anniversary of Modi Govt : 45 केंद्रांवर होणार पाचवा रोजगार मेळावा

Subscribe

नवी दिल्ली : या महिन्यातील 30 मे तारीख भारतीय जनता पक्षासाठी खूप खास आहे. कारण याच दिवशी 9 वर्षांपूर्वी भाजपाला लोकसभा निवडणुकीत पूर्ण बहुमत मिळाले होते. त्यामुळे हा दिवस आणखीन खास बनवण्यासाठी भाजपाकडून  (BJP) जोरदार तयारी सुरू आहे.

मोदी सरकार नववा वर्धापन दिन (Ninth Anniversary of Modi Govt) मोठ्या उत्साहात साजरा करणार आहे. या दिवशी 22 राज्यांमधील 45 केंद्रांवर पाचवा रोजगार मेळावा भरणार आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते 70 हजार तरुणांना नियुक्ती पत्रांचे वाटप होणार आहे. राज्यातील विविध केंद्रांवर होणाऱ्या रोजगार मेळाव्यात भाजपचे ज्येष्ठ नेत्यांपैकी पियुष गोयल मुंबई, धर्मेंद्र प्रधान भुवनेश्वर, अश्विनी वैष्णव जयपूर, हरदीप सिंग पुरी कपूरथळा येथे उपस्थित राहणार आहेत, तर निर्मला सीतारामन चेन्नई, नरेंद्र सिंह तोमर रतलाम, ज्योतिरादित्य सिंधिया भोपाळ, अनुराग सिंह ठाकूर शिमला येथे उपस्थित राहणार आहेत. याशिवाय इतर मंत्रईही सर्व ४५ केंद्रांवर उपस्थित राहणार आहेत.

- Advertisement -

अशा प्रकारे रोजगार मेळाव्याला झाली सुरूवात
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या वर्षाच्या शेवटी केंद्र सरकारमध्ये 10 लाख नोकऱ्या देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये रोजगार मेळाव्याला सुरूवात झआली आणि आतापर्यंत दोन लाख 88 हजार तरुणांना नियुक्तीपत्रे देण्यात आली आहेत. 22 ऑक्टोबर 2022 रोजी सुरू झालेल्या पहिला रोजगार मेळाव्यात नव्याने निवड झालेल्या 75 हजारांना नियुक्ती प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले होते. त्यानंतर 22 नोव्हेंबर 2022 रोजी आयोजित करण्यात आलेल्या दुसरा मेळाव्यात 71,000 नियुक्ती पत्रे देण्यात आली. 20 जानेवारी 2023 रोजी तिसरा मेळाव्यात 71,000 नियुक्ती पत्रे आणि 13 एप्रिल 2023 रोजी चौथ्या मेळाव्यात 71 हजार नियुक्तीपत्रे देण्यात आली आहेत.

केंद्र सरकारकडून वर्धआपन दिनाची जय्यत तयारी
अमित शाह यांनी वर्धापन दिनाच्या जय्यत तयारीसाठी  मंत्रिमंडळातील सदस्यांचा एक गट तयार केला आहे. यामध्ये कॅबिनेटमंत्र्यासह काही राज्यमंत्र्यांचा समावेश करण्यात आला आहे. वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाची रचना स्पष्ट करण्यासाठी येत्या काही दिवसांत पुन्हा या  गटाची बैठक होणार आहे. मंत्रिमंडळाच्या या गटात गजेंद्र शेखावत, प्रल्हाद जोशी, अर्जुन मेघवाल, व्ही. मुरलीधरन, राजीव चंद्रशेखर, भारती पवार, दर्शना जरदोश, एल मुरुगन आणि सुभाष सरकार यांचा समावेश करण्यात आला आहे. हा मंत्री गट इतर मंत्री आणि राज्यांच्या प्रतिनिधींशी समन्वय साधून मोदी सरकारच्या मागच्या नऊ वर्षांतील कामगिरीची जाहिरात करण्यासाठी विविध कार्यक्रमांची आखणी करणार आहे. मागच्या नऊ वर्षांत मोदी सरकारने काय जनतेसाठी काय काम केले हे लोकांपर्जयंत पोहोचवले जाईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -