घरताज्या घडामोडीNipah virus: देशासाठी धोक्याची घंटा, केरळमध्ये १२ वर्षीय मुलाचा निपाह व्हायरसमुळे मृत्यू

Nipah virus: देशासाठी धोक्याची घंटा, केरळमध्ये १२ वर्षीय मुलाचा निपाह व्हायरसमुळे मृत्यू

Subscribe

२०१८मध्ये केरळच्या कोझिकोड आणि मलप्पुरम या जिल्ह्यातून निपाह व्हायरसची काही प्रकरणे समोर आली होती.

देशात कोरोना (Covid-19) महामारीने थैमान घातले आहे. देशात एकट्या केरळ राज्यात कोरोनाचे ६० टक्के रुग्ण आहेत. केरळ राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याचे नागरिक चिंतेत आहेत. मात्र त्यांची चिंता आता आळखी वाढली आहे. केरळच्या कोझिकोड जिल्ह्यात निपाह (Nipah) व्हायरस आढळून आला आहे. निपाह व्हायरस आढळल्याने केंद्र सरकारने NCDC ची एक टीम केरळला रवाना केली. ही टीम आज केरळमध्ये दाखल होईल.  केरळमध्ये एका १२ वर्षीय मुलाला निपाह व्हायरसची लागण झाल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. (Nipah virus: 12-year-old boy dies due to Nipah virus in Kerala )  केरळच्या कोझिकोड जिल्ह्यात ३ सप्टेंबर रोजी एन्सेफलाइटिस आणि मायोकार्डिटिसच्या लक्षणांसोबतच १२ वर्षांच्या मुलाला निपाह व्हायरसची लागण झाल्याचे निदर्शनास आले होते. वटवाळाच्या लाळेतून पसरणारा या व्हायरस केरळमध्ये पसरण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे केंद्र सरकारने केरळ राज्याला सतर्कतेचा इशारा दिला आहे.

- Advertisement -

१२ वर्षीय मुलाच निपाह व्हायरसची लागण होऊन मृत्यू झाल्यानंतर केंद्र सरकारने सर्व राज्यांना तात्काळ सार्वजनिक आरोग्याविषयी उपयोजना पाळण्याच्या सूचना दिल्या आहेत. निपाहमुळे मृत्यू झालेल्या मुलाच्या कुटुंबियांचा त्याचप्रमाणे त्याचे नातेवाईक आणि त्याच्या संपर्कात आलेल्या सर्वांचा शोध घेण्यात येत आहे. केंद्राने दिलेल्या माहितीनुसार १२ वर्षीय मृत मुलाला निपाहचा संसर्ग झाल्यानंतर त्याच्या संपर्कात आलेल्यांचे ट्रेसिंग सुरू आहे. मुलाच्या संपर्कात आलेल्या सर्वांना क्वारंटाईन करण्यात येणार आहे. त्यांची चाचणी केली जाणार आहे.

२०१८मध्ये केरळच्या कोझिकोड आणि मलप्पुरम या जिल्ह्यातून निपाह व्हायरसची काही प्रकरणे समोर आली होती. निपाहचे एकूण १८ रुग्ण आढळून आले होते. त्यातील १७ जणांचा मृत्यू झाला होता. केरळमध्ये कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्या वाढत असताना निपाह रुग्ण आढळल्याने केरळची चिंता आणखी वाढली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – अमेरिकेत Delta Variantचा कहर! प्रत्येक ५५ सेकंदाला एकाचा मृत्यू, तर प्रत्येकी ६० सेकंदाला १११ लोकं कोरोनाबाधित

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -