घरदेश-विदेशHaridwar Kumbh 2021: कुंभमेळ्यात कोरोनाचं थैमान; निरंजनी आखाड्यानं केली कुंभ समाप्तीची घोषणा

Haridwar Kumbh 2021: कुंभमेळ्यात कोरोनाचं थैमान; निरंजनी आखाड्यानं केली कुंभ समाप्तीची घोषणा

Subscribe

उद्या, १७ एप्रिल रोजी कुंभ मेळा समाप्त करण्यात येणार

हरिद्वार येथील कुंभमेळ्यामध्ये दुसऱ्या शाही स्नान पर्वाचे औचित्य साधत मोठ्या संख्येने साधू-संत गंगा नदीत स्नान करताना दिसले. यामध्ये साधारण ४८ लाख भाविक सहभागी झाले होते. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर निर्बंध लागू असताना कुंभमेळ्यात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडालेला दिसला. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या ४ दिवसात कुंभमेळ्याच्या परिसरातील १७०० जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. हाच वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आता कुंभमेळा समाप्तीची चर्चा होताना दिसतेय.

गुरूवारी झालेल्या चर्चेदरम्यान, निरंजनी आखाड्यानं समाप्तीची घोषणा केली आहे. ‘कोरोनाचा वाढता संसर्ग बघता आखाड्यानं उद्या, १७ एप्रिल रोजी कुंभ मेळा समाप्त करण्यात येणार आहे’, असे आखाड्याचे सचिव महंत रवींद्र पुरी यांनी सांगितले आहे. यासह कोरोना गंभीर स्थिती पाहाता लोकांच्या आरोग्यासाठी कुंभ समाप्तीची घोषणा करणे आवश्यक आहे, यामुळे इतर आखाड्यांनाही मेळा समाप्त करण्याचं आवाहन पुरी यांनी केले आहे.

- Advertisement -

दरम्यान, कुंभात सहभागी झालेल्या साधु-संतांसह भाविकांनाही देखील कोरोनाचा संसर्ग होताना दिसतोय. यापार्श्वभूमीवर ठरलेल्या वेळेच्या आधीच कुंभ मेळा समाप्त करण्याचा निर्णय आखाड्यानं घेतला आहे. पुरी यांनी असे सांगितले की, २७ एप्रिल रोजी महाकुंभचे शाही स्नान आहे, हे या महाकुंभचे अंतिम शाही स्नान असणार आहे. त्यामुळे, महाकुंभची परंपरा सुरुच राहणार आहे. मात्र, यादिवशी बहुतेक संत हे सांकेतिक स्नानच करणार आहे. कोरोनाचा फैलाव नियंत्रणात आणण्यासाठी आखाड्याच्या छावणीमध्ये उपस्थित सर्व संतांना लवकर आपल्या मंदिरांमध्ये आणि मठांमध्ये परत जाण्याचे आवाहन देखील त्यांनी केले आहे.

सोशल डिस्टन्सिंग, मास्क आणि कोरोनाचे नियमांना पायदळी तुडवत लाखोंच्या संख्येनं भाविक कुंभमेळ्यासाठी हजर होते. लाखोंच्या संख्येत भाविकांनी लावलेली हजेरी आणि झालेल्या प्रचंड गर्दीदरम्यान थर्मल स्क्रीनिंग आणि इतर उपाययोजना करण्यात राज्य सरकारला कोणतेही यश आले नसल्याचे दिसून आले. परंतु, शाही स्नानाच्या वेळी राज्य सरकारने केंद्राकडून जारी करण्यात आलेल्या सर्व सूचनांचे पालन केले असल्याचे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांच्याकडून सांगण्यात आले आहे.


Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -