नीरव मोदीने दिली ठार मारण्याची धमकी; ‘त्या’ने केला लंडनच्या कोर्टात खुलासा

nirav modi

पीएनबी घोटाळ्यातील आरोपी नीरव मोदी यांना लंडनवरून भारतात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्या संदर्भात लंडनच्या वेस्टमिंस्टर येथील कोर्टात सोमवारी झालेल्या सुनावणीत काही धक्कादायक माहिती समोर आली. भारतीय अधिकाऱ्यांनी कोर्टासमोर नीरव मोदीचा नवीन व्हिडिओ सादर केला आहे. या व्हिडिओमध्ये एक इसम नीरव मोदी त्याला मारून टाकण्याची धमकी देत असल्याचे सांगत आहे.

हेही वाचा – ‘धर्मनिष्ठेचा महामेरू’..छत्रपती संभाजी महाराज!

काय आहे प्रकरण 

नीरव मोदीच्या भारत प्रत्यर्पणासंबंधी लंडनच्या कोर्टात बुधवारी झालेल्या सुनावणीत सीबीआय आणि ईडीने न्यायाधीशांना एक व्हिडिओ सुपूर्द केला. हा व्हिडिओ कोर्टात लावण्यात आल्यानंतर ही धक्कादायक बाब समोर आली. या व्हिडिओमध्ये सहा भारतीयांनी आपले म्हणणे मांडले आहे. त्यातील प्रत्येकाने दुबई सोडून मिस्त्रमधील काहिरामध्ये जाण्यासाठीचा दबाव टाकण्यात आल्याचा आरोप मोदीवर केला आहे. त्यांनी सांगितले की त्यांच पासपोर्ट जप्त करण्यात आले असून त्यांच्या इच्छेविरोधात नीरव यांचे भाऊ नेहाल मोदीने काही कागदपत्रांवर खोट्या सह्या केल्याचेही आरोप या लोकांनी या व्हिडिओच्या माध्यमातून केले आहेत.

काय आहे व्हिडिओमध्ये

माझ नाव आशीष कुमार मोहनभाई लाड आहे. मी सनसाईन जेम्स लि., हाँगकाँग आणि दुबईमधील युनिटी ट्रेडिंगमध्ये सहसंस्थापक आहे. नीरव मोदीने मला फोन केला आणि म्हणाला की तो माझ्यावर चोरीचा आळ आणेल. तो अत्यंत वाईट शब्दात माझ्याशी बोलला. तो म्हणाला मला मारून टाकण्यास सांगेल, असे या व्हिडिओमधील इसमाने म्हटले आहे. हा व्हिडिओ जून २०१८ चा आहे.