घरताज्या घडामोडीनिर्भयाच्या बलात्काऱ्यांची कोर्टात संतापजनक मागणी!

निर्भयाच्या बलात्काऱ्यांची कोर्टात संतापजनक मागणी!

Subscribe

निर्भया बलात्कार प्रकरणातील एका गुन्हेगाराने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली असून त्यामध्ये त्यांनी दिलेलं कारण अजब आणि संतापजनक आहे.

एकीकडे हैदराबाद बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी एन्काऊंटरमध्ये ठार केल्यानंतर लोकांकडून समाधानाच्या भावना व्यक्त होत असतानाचा आता दिल्लीत २०१२ साली झालेल्या निर्भया बलात्कार प्रकरणातील गुन्हेगारांना देखील तातडीने शिक्षा दिली जावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. या गुन्हेगारांची दया याचिका काही दिवसांपूर्वीच केंद्रीय गृह मंत्रालयाने फेटाळल्यानंतर त्यांना फाशीची शिक्षा होणार यावर शिक्कामोर्तब झालं आहे. कोर्टानं त्यांच्या फाशीच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब केल्यानंतर त्यांनी राष्ट्रपतींकडे दया याचिका केली होती. गृहमंत्रालयाने राष्ट्रपतींना देखील दया याचिका फेटाळण्यासंदर्भात शिफारस केली होती. त्यानंत आता यातला एक गुन्हेगार अक्षय कुमार सिंह याने सर्वोच्च न्यायालयात एक नवीन पुनर्विचार याचिका दाखल केली आहे. या याचिकेमध्ये अक्षय सिंहने केलेल्या संतापजनक मागणीकडे आता सर्वोच्च न्यायालय कोणत्या भूमिकेतून पाहाते, याकडे साऱ्याचं लक्ष लागलं आहे.

काय आहे अक्षयची मागणी?

अक्षय सिंहने मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाच एक फेरविचार याचिका दाखल केली आहे. या याचिकेमध्ये अक्षयने त्याची फाशीची शिक्षा रद्द केली जावी, अशी मागणी केली आहे. मात्र, त्यासाठी त्याने दिलेलं कारण संतापजनक आहे. ‘दिल्लीतली हवा तशीही खूप प्रदूषित झालेली आहे. तिच्यामुळे तसाही कालांतराने मृत्यू येणारच आहे. मग आधीच आम्हाला का मृत्यूदंड देता?’ असा सवाल या याचिकेमध्ये आरोपीने विचारला आहे. दरम्यान, अक्षय सिंह या घटना घडली त्या दिवशी, म्हणजेच १६ डिसेंबर २०१२ रोजी दिल्लीमध्ये नसून त्याच्या गावी बिहारमधल्या औरंगाबाद येथे होता, असा दावा देखील याचिकेमध्ये करण्यात आला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – हैदराबाद बलात्कार प्रकरण: पोलिसांनी केलं ते कायद्याला धरुन नव्हतं-उज्ज्वल निकम

तिहारमध्ये फाशीची तयारी पूर्ण?

दरम्यान, एका अल्पवयीन गुन्हेगाराला सोडून दिल्यानंतर उरलेल्या चौघांना घटना घडली त्याच दिवशी म्हणजे १६ डिसेंबरलाच फाशी देण्याची तयारी तिहार जेलमध्ये करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. यासाठी बक्सर जेलमधून फाशीचा दोरखंड देखील मागवण्यात आला आहे. अफजल गुरूला फाशी दिली, तेव्हा हा दोरखंड बक्सर जेलमध्ये नेण्यात आला होता. त्यासोबतच, चौघांना फाशी देण्यासाठी जल्लादाची देखील नेमणूक करण्यात आली आहे. आता कारागृह प्रशासन फक्त कोर्टाकडून येणाऱ्या ब्लॅक वॉरंटची वाट पाहात आहे. या वॉरंटनुसार कोर्टाकडून गुन्हेगारांना फाशी देण्याचे आदेश देण्यात येतात.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -