घरताज्या घडामोडीतुम्ही आगीशी खेळताय... निर्भया प्रकरणातील सत्र न्यायाधीशांनी खडसावले

तुम्ही आगीशी खेळताय… निर्भया प्रकरणातील सत्र न्यायाधीशांनी खडसावले

Subscribe

निर्भया प्रकरणात तारीख पे तारीख, कोर्टाच्या पुढच्या निर्णयापर्यंत फाशी टळली

निर्भया गॅंगरेपमध्ये चौघांच्या फाशीच्या निर्णयावर कोर्टाच्या पुढील आदेशापर्यंत स्थगिती देण्याचा निर्णय आज पटियाला कोर्टाने दिला. जुन्या डेथ वॉरंटनुसार मंगळवारी सकाळी ६ वाजता या आरोपींना फाशीची शिक्षा दिली होती. कोर्टाच्या निर्णयामुळे ही फाशीची शिक्षा आता पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे.

पटियाला हाऊस कोर्टाने दोषी पवनची याचिका दाखल करून घेत स्पष्ट केले की त्याची दया याचिका राष्ट्रपतींसमोर प्रलंबित आहे. त्यामुळे पवनच्या याचिकेवर स्थगिती देण्यात आली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने केलेल्या खुलाशानुसार राष्ट्रपतींकडे पाठवण्यासाठी पवनची याचिका मिळाली आहे.
अतिरिक्त सत्र न्यायाधीश धर्मेंद्र राणा यांनी पवन गुप्ता याच्या याचिकेवर खुलासा करताना आरोपींच्या वकीलांना सांगितले की तुम्ही आगीसोबत खेळत आहात, तुम्हाला सतर्क रहायला हव. कोणत्याही एका चुकीच्या पावलाचा तुम्हाला परिणाम सहन करावा लागू शकतो. सुनावणी दरम्यान तिहार जेलच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की याचिका दाखल झाल्यामुळे आता हे प्रकरण सरकारी पातळीवर प्रलंबित आहे. जेव्हा राष्ट्रपती भवनाकडूनच या फाशीच्या दया याचिकेवर स्थगिती येईल तेव्हाच फाशीच्या लांबणीच्या प्रकरणावर स्थगिती येईल.

- Advertisement -

आज सर्वोच्च न्यायालयाने निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील दोषी पवन गुप्ताची क्युरेटिव्ह याचिका फेटाळली. त्यामुळे निर्भया बलात्कार प्रकरणातील चारही दोषींना उद्या फासावर लटकवण्याची शक्यता आहे. तसंच आता पटियाला न्यायालयाकडून जारी केलेल्या नवीन डेथ वॉरंट थांबवण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. मात्र या निकालानंतर पवनने पुन्हा एकदा राष्ट्रपती दया याचिका केली आहे, असं पवन गुप्ताचे वकील ए.पी सिंग यांनी सांगितलं आहे. त्यामुळे या दयेच्या अर्जावर काही सुनावणी होते का? किंवा राष्ट्रपती काय निर्णय घेतात याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -