घरताज्या घडामोडीफाशी नको, आजीवन कारावास द्या; निर्भयाच्या दोषीची मागणी

फाशी नको, आजीवन कारावास द्या; निर्भयाच्या दोषीची मागणी

Subscribe

आरोपीचे वकील ए.पी. सिंग यांनी सीआरपीसीच्या कलम ४३२ आणि ४३३ अंतर्गत फाशीची शिक्षा स्थगित करण्याची मागणी केली आहे.

निर्भया प्रकरणातील आरोपी विनय शर्मा याने फाशी पासून बचाव व्हावा म्हणून नवी शक्कल लढवली आहे. आरोपी विनयने फाशी नको आजीवन कारावास द्या अशी विनवणी दिल्लीचे उपराज्यपाल अनिल बैजल यांच्याकडे केली आहे. पटियाला हाऊस न्यायालयाने डेथ वॉरंट जारी केले असून त्यानुसार दोषींना २० तारखेला पहाटे साडेपाच वाजता फाशी दिली जाणार आहे.


हेही वाचा – …तरच तुला संघात स्थान मिळेल!, बीसीसीआयची धोनीला अट

आरोपीचे वकील ए.पी. सिंग यांनी सीआरपीसीच्या कलम ४३२ आणि ४३३ अंतर्गत फाशीची शिक्षा स्थगित करण्याची मागणी केली आहे. आपले कमी वय, कुटुंबाची सामाजिक-आर्थिक परिस्थिती विचारात घेऊन फाशीची शिक्षा दिली जाऊ नये, असेही दोषींनी म्हटले आहे.

- Advertisement -

२०१२ च्या निर्भया प्रकरणाने देशभरात खळबळ उडवून दिली होती. कनिष्ठ न्यायालयापासून ते सर्वोच्च न्यायालयापर्यंत सर्वत्र दोषींच्या फाशीच्या शिक्षेवर शिक्‍कामोर्तब झाले. राष्ट्रपतींनी देखील दोषींची दयायाचिका फेटाळून लावली आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -