घरताज्या घडामोडीनिर्भयाच्या दोषींची फाशी पुन्हा पुढे ढकलली

निर्भयाच्या दोषींची फाशी पुन्हा पुढे ढकलली

Subscribe

संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या निर्भया प्रकरणातील चार आरोपींची फाशीची शिक्षा पटियाला न्यायालयाने पुढे ढकलली आहे. न्यायालयाच्या पुढील आदेशापर्यंत या चारही दोषींना फाशी देऊ नये असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. याप्रकरणातील दोषी विनय शर्मा याची दया याचिका राष्ट्रपतींकडे प्रलंबित आहे. याचा हवाला देत ही फाशी पुढे ढकलण्यात आल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.

निर्भया प्रकरणातील चारही दोषींना उद्या १ फेब्रुवारी रोजी फाशीची शिक्षा देण्यात येणार होती. त्यासाठी जेल प्रशासनही सज्ज झाले होते. पण आता न्यायालयाने जर दोषींचा दयेचा अर्ज प्रलंबित असेल तर त्याला फाशी देता येत नाही असे सांगत फाशीची शिक्षा दुसऱ्यांदा पुढे ढकलली आहे. याआधी २२ जानेवारी रोजी सकाळी ७ वाजता या चारही दोषींना फाशीची शिक्षा देण्यात येणार होती.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -