घरताज्या घडामोडीनिर्भया बलात्कार - आता तिसऱ्या दोषीची क्युरेटिव्ह पेटिशन!

निर्भया बलात्कार – आता तिसऱ्या दोषीची क्युरेटिव्ह पेटिशन!

Subscribe

निर्भया प्रकरणात आणखी एका आरोपीची सर्वोच्च न्यायालयात क्युरेटिव्ह पिटिशन दाखल

येत्या १ फेब्रुवारीला निर्भया बलात्कार आणि हत्या प्रकरणातील ४ दोषी, विनयकुमार, अक्षयकुमार, मुकेश कुमार आणि पवन कुमार या चौघांना फाशीची शिक्षा देण्याचा निकाल दिल्ली कोर्टाने दिला आहे. मात्र, निर्भयाचे हे गुन्हेगार एकानंतर एक अशा याचिका आणि नंतर राष्ट्रपतींकडे दया याचिका करत असल्यामुळे फाशीच्या शिक्षेला लांबवण्याचा प्रयत्न होत आहे. या प्रकरणी दोशी मुकेश कुमार याची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर आता अक्षयकुमार ठाकूर याने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. क्युरेटिव्ह पेटिशन हा सर्वोच्च न्यायालयात न्याय मागण्याचा शेवटचा पर्याय गुन्हेगारांकडे असतो. त्यानंतर थेट राष्ट्रपतींकडेच दया याचिका होऊ शकते. याआधी या चौघांपैकी विनयकुमार आणि मुकेश कुमार या दोघांनी अशा प्रकारे केलेली क्युरेटिव्ह पेटिशन सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. त्यांच्या दया याचिका देखील राष्ट्रपतींनी फेटाळल्या आहेत.


हेही वाचा – ‘तुरुंगात माझ्यावर लैंगिक अत्याचार झाला’, निर्भया प्रकरणातील दोषीचा आरोप

मुकेश कुमार सिंहने राष्ट्रपतींनी दया याचिका फेटाळल्याच्या निर्णयाविरोधात दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली होती. ‘दया याचिका फेटाळताना पुरेसा विचार केला गेला नाही’, असा दावा मुकेशच्या वकिलांनी केला होता. मात्र, न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली आहे. आता अक्षयकुमार ठाकूर याच्या याचिकेवर आज सुनावणी होऊन उद्या सकाळी त्यावर निकाल दिला जाणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -