घरताज्या घडामोडीनिर्भया बलात्कार प्रकरणी गुन्हेगाराची पुन्हा फेरविचार याचिका

निर्भया बलात्कार प्रकरणी गुन्हेगाराची पुन्हा फेरविचार याचिका

Subscribe

२०१२ साली घडलेल्या आणि अवघ्या देशाला हादरवून सोडलेल्या निर्भया बलात्कार प्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा कायम ठेवत फाशीची तारीख देखील निश्चित केली आहे. मात्र, याला २४ तासदेखील उलटत नाहीत, तोवर या प्रकरणातील ४ गुन्हेगारांपैकी एकानं पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयामध्ये फेरविचार याचिका दाखल केली आहे. त्यामुळे आता ही क्युरेटिव्ह याचिका दाखल करून घ्यायची की फेटाळून लावायची, याचा निर्णय सर्वोच्च न्यायालय घेणार आहे. जर न्यायालयाने याचिका दाखल करून घेतली, तर त्यावर पुन्हा सुनावणी होऊ शकते. ४ गुन्हेगारांपैकी विनय शर्मा याने अॅडव्होकेट ए. पी. सिंह यांच्यमार्फत न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

- Advertisement -

२२ जानेवारी रोजी सकाळी ७ वाजता या चारही गुन्हेगारांना फाशी देण्यात येणार आहे. त्यासाठीची पूर्वतयारी देखील प्रगतीपथावर आहे. मात्र, दिल्ली उच्च न्यायालयाने यासंदर्भात घेतलेल्या सुनावणीदरम्यान गुन्हेगारांना फेरविचार याचिका करण्यासाठी १४ दिवसांचा कालावधी दिला होता. मात्र, दुसऱ्याच दिवशी यातल्या एका गुन्हेगाराने क्युरेटिव्ह याचिका दाखल केली आहे.


वाचा सविस्तर – निर्भयाच्या गुन्हेगारांना डेथ वॉरंट जारी!
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -