घरअर्थजगतNirmala Sitharaman Interview: कोरोनाचं संकट असतानाही आम्ही आर्थिक सुधारणा सुरूच ठेवल्यात -...

Nirmala Sitharaman Interview: कोरोनाचं संकट असतानाही आम्ही आर्थिक सुधारणा सुरूच ठेवल्यात – अर्थमंत्री निर्मला सीतारामण

Subscribe

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज सांगितले की, कोरोना सारखं जागतिक संकटं असूनही आम्ही आर्थिक सुधारणा सुरू ठेवल्या आहेत, असं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितलंय. अर्थसंकल्पानंतर एका खासगी वृत्तवाहिनीला मुलाखत देताना अर्थमंत्र्यांनी ही माहिती दिली, देशाची अर्थव्यवस्था टिकवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी सतत चर्चा होत आहे, असंही त्या यावेळी म्हणाल्या.

यापुढे बोलताना निर्मला सीतारामन म्हणाल्या की, “अशी परिस्थिती हाताळण्यासाठी माझ्यापुढे पूर्वीची कोणतीही उदारहणं नव्हती. याआधी अशी परिस्थिती उद्भवलीच नव्हती, ज्याचं अनुसरण करता येईल. साथीच्या रोगानंतर आम्ही सर्व हितचिंतकांशी संवाद साधला. पंतप्रधान मोदींनी या चर्चेचे नेतृत्व केले.

- Advertisement -

अर्थसंकल्प २०२३ पासून अपेक्षित असलेल्या महत्त्वाच्या परिणामांबद्दल बोलताना, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी हा संवाद साधला आणि म्हणाल्या, ‘परदेशातून येणाऱ्या लोकांसह पर्यटनात लक्षणीय बदल व्हावी, अशी मला अपेक्षा आहे. अर्थव्यवस्था सक्रिय ठेवण्याचा हा एक चांगला मार्ग असेल.

त्या पुढे म्हणाल्या, “मला पीएम-विकास योजनेत एक आशा दिसत आहे. कारण या योजनेला खूप मोठी बाजारपेठ आहे आणि ती लॉन्च केल्यामुळे आम्ही मोठ्या संख्येने लोकांपर्यंत पोहोचू शकू.”

- Advertisement -

अर्थमंत्री पुढे म्हणाल्या, ‘अर्थसंकल्पापूर्वी सर्वांचे मत घेण्यात आले. आर्थिक नुकसानीबाबत राज्यांशी चर्चा करण्यात आली. अर्थसंकल्पात सर्वांची काळजी घेण्यात आली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात म्हटले होते की, आर्थिक वर्ष २०२५-२६ पर्यंत वित्तीय तूट ४.५ टक्क्यांच्या खाली आणली जाईल. अर्थसंकल्पात पुढील आर्थिक वर्षासाठी कर प्राप्ती २३.३ लाख कोटी रुपये ठेवण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. याशिवाय राज्यांना सकल देशांतर्गत उत्पादनाच्या (जीडीपी) ३.५ टक्क्यांपर्यंत राजकोषीय तुटीची परवानगी दिली जाईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -