घरBudget 2024Budget 2024 : पुढचे सरकारही भाजपचेच! निर्मला सीतारामन यांचे अर्थसंकल्पीय भाषणातून संकेत

Budget 2024 : पुढचे सरकारही भाजपचेच! निर्मला सीतारामन यांचे अर्थसंकल्पीय भाषणातून संकेत

Subscribe

Budget 2024 नवी दिल्ली – केंद्रातील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) सरकारचा दुसऱ्या टर्ममधील शेवटचा अर्थसंकल्प आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी त्यांच्या कार्यकाळातील सहावा अर्थसंकल्प आज (गुरुवार) सादर केला. यावेळी त्यांनी कोणत्याही मोठ्या घोषणा केल्या नाही. नोकरदारांना आपेक्षीत असलेल्या कररचनेत कुठलाही बदल करण्यात आलेला नाही. एनडीए सरकारच्या दहा वर्षांतील कामाची उजळणी करत अर्थमंत्री सीतारामन यांनी पुढेचे सरकार आमचेच असणार याचे संकेत अर्थसंकल्प सादर करताना दिले.

निळ्या रंगाच्या साडीत संसदेत आल्या अर्थमंत्री 

अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) संसदेत येण्यापूर्वी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या भेटीसाठी गेल्या. राष्ट्रपतींनी स्वतःच्या हाताने त्यांना गोड खाऊ घातले. निळ्या रंगाची साडी नेसलेल्या निर्मला सीतारामन पारंपरिक ‘वही-खाता’ शैलीत डिजिटल टॅबलेट घेऊन संसदेत पोहचल्या. यापूर्वी ब्रिफकेसमध्ये बजेटच्या कॉपी घेऊन अर्थमंत्री येत होते. सीतारामन यांनी ही पंरपरा मोडली आहे. त्या सोनेरी रंगाचे राष्ट्रीय चिन्ह अशोकस्तंभ असलेल्या लाल रंगाच्या आवरणात लपेटलेले टॅबलेट घेऊन संसदेत येतात. त्यांच्या अर्थमंत्रीपदाच्या कारकिर्दीतील हा सहावा अर्थसंकल्प होता.

- Advertisement -

सीतारामन यांनी निवडणुकीपूर्वी सादर केलेल्या अंतरिम अर्थसंकल्पात एप्रिलपासून सुरु होणाऱ्या नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्या चार महिन्यांसाठीची तरतूद केली आहे. यावेळी अर्थमंत्री सीतारामन म्हणाल्या, “जुलैमध्ये आम्ही पूर्ण अर्थसंकल्प सादर करु. आमचे सरकार विकसीत भारताचे स्वप्न पूर्ण करणारा रोडमॅप आगामी अर्थसंकल्पात सादर करेल.” त्यांच्या या विधानाने मोदी सरकार आगामी लोकसभा 2024 निवडणुकीत विजयी होणार असल्याचाच दावा त्यांनी एकप्रकारे केला आहे.

- Advertisement -

नरेंद्र मोदी पंतप्रधान म्हणून तिसरी टर्म देखील पूर्ण करतील असेच संकेत निर्मला सीतारामण यांनी दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील 15 ऑगस्टला 77व्या स्वातंत्र्य दिनी लाल किल्ल्यावरुन केलेल्या भाषणातही पुढील पाच वर्षे अभूतपूर्व विकासाचे असतील असा विश्वास व्यक्त केला होता. त्यातून त्यांनी भाजप तिसरी टर्म पूर्ण करणार असेच संकेत दिले होते. याच वक्तव्याची पुनरावृत्ती पंतप्रधान मोदींनी 19 जानेवारी रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर आल्यानंतर सोलापूरमधील सभेतही केली होती.

आज सीतारामन यांनी अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. यानंतरचा पूर्ण अर्थसंकल्प जुलैमध्ये सादर होणार आहे. त्याआधी लोकसभेची निवडणूक होईल. अर्थमंत्री सीतारामन यांनी आमचेच सरकार पुढचा अर्थसंकल्प सादर करेल असे सांगत विकसीत भारताचे लक्ष्य प्राप्त करण्याचा विस्तृत रोडमॅप तेव्हा सादर केला जाईल असे म्हटले आहे. या अर्थसंकल्पात कररचना जैसे थे ठेवण्यात आली आहे. त्यामध्ये बदल देखील पुढील अर्थसंकल्पातच होतील अशी चिन्ह आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -