निर्मला सीतारामन यांनाही ‘कांतारा’ची भुरळ; चित्रपटाचे कौतुक करत म्हणल्या…

सीतारामन यांनी बंगळुरुमध्ये हा चित्रपट पाहिला. त्यावेळी माध्यमांशी बोलताना हा चित्रपट म्हणजे एक ऐवज असून त्याने आपली परंपरा, संस्कृती यांचे जतन केले आहे.

गेल्या काही दिवसांपासून देशात कांतारा या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. कन्नड भाषेतील हा चित्रपट गेल्या महिन्याभरापासून बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. 30 सप्टेंबर रोजी हा चित्रपट कन्नड भाषेत प्रदर्शित झाला होता. त्यानंतर 14 नोव्हेंबर रोजी हिंदी, तमीळ, तेलुगू, मल्याळम अशा भारतीय भाषांतही हा चित्रपट डब करण्यात आला. अशातच देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सुद्धा कांतारा चित्रपटाचे कौतुक केले आहे. (Nirmala Sitharaman is also fascinated by ‘Kantara’; Appreciating the film, she said…)

कांतारा या चित्रपटाचे कौतुक होत असताना आता थेट देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देखील कांताराचे कौतूक केले आहे. सीतारामन यांनी बंगळुरुमध्ये हा चित्रपट पाहिला. त्यावेळी माध्यमांशी बोलताना हा चित्रपट म्हणजे एक ऐवज असून त्याने आपली परंपरा, संस्कृती यांचे जतन केले आहे. त्याचे कौतूक करावे तेवढे कमी आहे. सध्या देशभरातून कांतारावर कौतूकाचा वर्षाव होतो आहे. हा चित्रपट या कौतुकाला पात्र आहे. मानवी मुल्य, त्यात होणारे संघर्ष आणि धार्मिकता यांची योग्य सांगड कांतारातून घालण्यात आली आहे. कांतारा हा वेगळ्या प्रकारे आपले मनोरंजन करतो. आपल्याशी संवाद साधू पाहतो. तेव्हा त्या चित्रपटाकडे वेगळ्या चष्म्यातून पाहिले गेले पाहिजे. असे सीतारामन म्हणाल्या.

कांतारा’ची कथा ऋषभ शेट्टीनं लिहीली असून तोच या चित्रपटाचा दिग्दर्शक आहे आणि त्याने या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली आहे. सोशल मीडियावरही ‘कांतारा’ ट्रेंडींगमध्ये अग्रेसर आहे. फक्त 16 कोटी रूपयांत बनलेल्या या सिनेमाने बजेट कधीच वसूल झाले आहे. महत्त्वाचे म्हणजे मर्यादीत स्क्रिन्सवर रिलीज होऊनही ‘कांतारा’ भरघोस कमाई करतोय.

कन्नडमध्ये 100 कोटीचा आकडा पार केल्यावर चित्रपटाला मिळणारा प्रतिसाद पाहून, गेल्या शुक्रवारी हा सिनेमा हिंदीत रिलीज झाला. हिंदी ‘कांतारा’ने रिलीजच्या पहिल्या दिवशी 1.27 कोटींची कमाई केली. दुसर्‍या दिवशी अंदाजे 2.35 कोटींचा गल्ला कमवला. म्हणजे दोन दिवसांत एकूण 3.62 कोटींचा बिझनेस केला आहे.


हे ही वाचा – उत्तर कोरियाने पुन्हा डागले बॅलेस्टिक क्षेपणास्त्र, जपानमध्ये आणीबाणीचा इशारा