घरताज्या घडामोडीNirmala Sitharaman : मला तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती, अर्थमंत्र्यांचा मनमोहन सिंह यांच्यावर...

Nirmala Sitharaman : मला तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती, अर्थमंत्र्यांचा मनमोहन सिंह यांच्यावर पलटवार

Subscribe

माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी व्हिडिओच्या माध्यमातून अर्थव्यवस्थेबाबत पीएम मोदींवर निशाणा साधला होता. त्यानंतर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मनमोहन सिंह यांच्यावर पलटवार केला आहे. भारताला खालच्या पाच स्तरावर आणण्यासाठी आणि महागाईच्या वाढत्या दरासाठी सिंग यांना अधिक लक्षात ठेवलं जाईल.

मनमोहन सिंह यांनी यूपीए सरकारच्या काळात अर्थव्यवस्थेला रूळावर आणण्याासाठी कधीही प्रयत्न करण्यात आले नव्हते. अशा प्रकारचा आरोप सीतारामन यांनी केला. आज भारताची अर्थव्यवस्था संपूर्ण जगभरात मोठ्या प्रमाणात वाढत आहे. जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून केली जात आहे, अशा वेळी मनमोहन सिंह भारताला खालच्या पातळीवर ढकलण्याचा प्रयत्न करत आहेत.

- Advertisement -

श्रीमंत अधिक श्रीमंत होत आहेत – मनमोहन सिंह

८८ वर्षीय माजी पंतप्रधान पंजाबमधील २० फेब्रुवारीच्या निवडणुकीपूर्वी काँग्रेसने प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओमध्ये म्हणाले की, भाजपच्या नेतृत्त्वाखाली सरकार आर्थिक धोरणाची काहीच समज नाही. श्रीमंत अधिक श्रीमंत होत आहेत. तर गरीब अधिक गरीब होत आहेत. जे मागील साडेसात वर्षे सत्तेत असलेले मोदी सरकार आपल्या चुका मान्य करून सुधारणा करण्याऐवजी जनतेच्या समस्यांसाठी पहिल्यांदा पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्यावर खापर फोडत आहेत, असं मनमोहन सिंह म्हणाले.

केंद्रीय मंत्र्यांचा पलटवार

मनमोहन सिंग यांच्या काळात सराफा बाजारात कशापद्धतीने कामं चालू होती. हेदेखील त्यांना माहितं नव्हतं. मला तुमच्याबद्दल खूप आदर आहे. परंतु मला तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती. मला खूप दुख: झालंय, असं निर्मला सीतारामन म्हणाल्या.

- Advertisement -

केंद्रीय अर्थमंत्र्यांनी मोदी सरकारच्या निर्यात, एफडीआय आणि महागाईच्या आकडेवारीची यूपीएच्या सरकारशी तुलना केली आणि त्यांची आकडेवारी अधिक चांगली असल्याचे त्यांनी सांगितले. महागाईवरून मोदी सरकारवर काँग्रेसकडून निशाणा साधला जात आहे. परंतु मोदी सरकारवर निशाणा साधणाऱ्यांनी संभ्रम निर्माण केल्याची प्रयत्न केल्याचा आरोप सीतारामन यांनी केला आहे.


हेही वाचा : HDFC, SBI Interest Rate : SBI, HDFC बँकेच्या FD व्याजदरात वाढ, ग्राहकांना होणार मोठा फायदा


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -