घरताज्या घडामोडीप्रौढांसाठी लसीकरणाची घोषणा अन् काही तासांतच सीरम, भारत बायोटेकला आगाऊ पैसे वित्त...

प्रौढांसाठी लसीकरणाची घोषणा अन् काही तासांतच सीरम, भारत बायोटेकला आगाऊ पैसे वित्त मंत्र्यांकडून मंजूर

Subscribe

देशात कोरोना व्हायरल कहर केला आहे. दररोज २ लाखांहून अधिक रुग्णांची होत आहे. त्यामुळे आता लसीकरण मोहीम वेगवान करण्यासाठी आज केंद्र सरकारद्वारे मोठा निर्णय घेण्यात आला. १ मेपासून लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात १८ वर्षांवरील सर्वांना कोरोनाची लस घेण्यासाठी परवानगी देण्यात आली. यानंतर लगेच वित्त मंत्र्यांकडून सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि भारत बायोटेकला आगाऊ पैसे मंजूर करण्यात आले आहे.

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि भारत बायोटेकला मिळून ४,५६७.५० कोटी रुपयांची आगाऊ देय मंजूर केले आहे. वित्त मंत्रालयाने सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियासाठी ३,००० कोटी रुपये आणि भारत बायोटेकसाठी १५६७.५० कोटी रुपये मंजूर केले आहेत.

- Advertisement -

या अस्थिरतेच्या काळात अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी उद्योगात आत्मविश्वास वाढवण्यासाठी कंबर कसली आहे. देशातील विविध राज्यांमध्ये लॉकडाऊन व कर्फ्यूमुळे उद्योगिक जगात पुन्हा विश्वास डगमगू लागला आहे. याच दृष्टीने वित्त मंत्री निर्मला सीतारमण यांनी अनेक कंपन्याच्या प्रमुखांशी चर्चा केली.

- Advertisement -

सीतारमण यांच्या नेतृत्वात सीआयआय, फिक्की, एसोचॅम, पीएचडी चेंबर ऑफ कॉमर्स, बॉम्बे चेंबर, बंगाल चेंबर ऑफ कॉमर्स, बेंगळुरू चेंबर ऑफ कॉमर्स, एक्सपोर्ट ऑर्गनायझेशन फियो, ऑटो मॅन्युफॅक्चरर्स ऑर्गनायझेशन सियाम, आयटी इंडस्ट्री ऑर्गनायझेशन नॅसकॉम यांच्यासह एलएंडटी, अपोलो, टीसीएस, मारुती सुझुकी आणि हीरो मोटो कॉर्पोरेशन सारख्या कंपन्यांच्या प्रमुखांशी चर्चा झाली.


हेही वाचा – केंद्राचा मोठा निर्णय! १ मे पासून १८ वर्षांवरील सर्वांना मिळणार कोरोनाची लस


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -