घरअर्थजगतअदानी प्रकरणात अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या, "हे एका कंपनीचं...."

अदानी प्रकरणात अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या, “हे एका कंपनीचं….”

Subscribe

अदानी ग्रूपमध्ये ज्यांनी गुंतवणूक केली त्यांना प्रचंड तोटा झाल्याचं चित्र आहे. त्यापाठोपाठ ज्या लोकांनी बॅंका आणि LIC पॉलिसीमध्ये पैसे गुंतवले ते ही बुडतील का? असा प्रश्न वारंवार विचारला जातोय.

Adani Group Nirmala Sitharaman: हिंडेनबर्ग रिपोर्टनंतर गौतम अदानीचे शेअर्स धडाधड कोसळू लागले. त्यामुळे अदानी ग्रूपमध्ये ज्यांनी गुंतवणूक केली त्यांना प्रचंड तोटा झाल्याचं चित्र आहे. त्यापाठोपाठ ज्या लोकांनी बॅंका आणि LIC पॉलिसीमध्ये पैसे गुंतवले ते ही बुडतील का? असा प्रश्न वारंवार विचारला जातोय. याच पार्श्वभूमीवर आता अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पुढे येऊन अदानी प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिलीय. “शेअर बाजारात अधूनमधून असे किरकोळ धक्के बसले आहेत. शेअर बाजार स्थिर ठेवण्यासाठी सेबी आणि रिझव्‍‌र्ह बँकेसारख्या नियामकांनी सदैव दक्ष असायला हवं, असं निर्मला सीतारामन म्हणाल्या.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी एका टीव्ही चॅनलशी संवाद साधताना ही प्रतिक्रिया दिली. यावेळी त्या म्हणाल्या, “बँका आणि विमा कंपन्यांनी कोणत्याही एका कंपनीत जास्त गुंतवणूक केलेली नाही. यासोबतच त्यांनी आश्वासन दिले की, भारतीय बाजारपेठा नियामकाकडून चांगल्या प्रकारे व्यवस्थापित केल्या जातात. बँका आणि विमा कंपन्या स्वत: पुढे येऊन अदानी समूहाबाबत त्यांची स्थिती स्पष्टपणे सादर करत आहेत. या कंपन्यांनी कोणत्याही एका कंपनीत जास्त पैसे गुंतवलेले नाहीत. ते स्वतः समोर येऊन हे सांगत आहेत.”

- Advertisement -

यापुढे बोलताना सीतारामन म्हणाल्या की, गेल्या १० दिवसांत अदानी ग्रूपमधील कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे. हिंडनबर्ग रिसर्च रिपोर्टमध्ये अदानी ग्रूपने शेअरच्या किंमत वाढवण्यासाठी चुकीच्या पद्धतींचा अवलंब केल्याचा आरोप केल्यानंतर या समूहाचे बाजार भांडवल $१०० अब्ज पेक्षा जास्त घसरले आहे. पण अदानी समूहाने हे आरोप फेटाळले आहेत.

 

- Advertisement -

हे एका कंपनीचं प्रकरण आहे…

या प्रकरणात नियामकांच्या भूमिकेबद्दल विचारले असता सीतारामन म्हणाल्या, “माझे एकच मत आहे की नियामक, मग ते आरबीआय असो किंवा सेबी, त्यांनी वेळेवर काम केले पाहिजे आणि बाजार स्थिर ठेवण्यासाठी काम केले पाहिजे.” नियामकांनी नेहमी सतर्क असले पाहिजे असे माझे मत आहे.” असं देखील सीतारामन म्हणाल्या. मला या प्रकरणाचा भारतातील परकीय भांडवलाच्या प्रवाहावर काही परिणाम झालेला दिसत नाही. गेल्या काही दिवसांत परकीय चलनाच्या साठ्यात आठ अब्ज डॉलरची वाढ झाली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -