Homeदेश-विदेशNitin Gadkari : अपघात झाल्यावर 'एवढा' खर्च सरकार करणार, नितीन गडकरींची घोषणा;...

Nitin Gadkari : अपघात झाल्यावर ‘एवढा’ खर्च सरकार करणार, नितीन गडकरींची घोषणा; फक्त एकच अट…

Subscribe

Nitin Gadkari On Hit And Run : धनदांडग्यांच्या हिट अॅण्ड रन प्रकरणात एखाद्या निरपराधाचा मृत्यू झाल्यास मृताच्या कुटुंबाला 2 लाख रूपये मिळतील, असं गडकरींनी म्हटलं.

दिल्ली : देशातील रस्ते अपघातांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर अपघातांत जखमी झालेल्यांना उपचारांसाठी केंद्र सरकार थेट मदत करणार आहे. अपघातग्रस्तांवर मोफत ( कॅशलेस ) आणि तातडीनं उपचार होण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी नवी योजना जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत अपघात झाल्यावर 24 तासांच्या आत पोलिसांना माहिती द्यावी लागणार आहे. मगच पीडितांच्या उपाचाराचा 7 दिवस किंवा दीड लाखांपर्यंतचा खर्च केंद्र सरकारतर्फे केला जाणार आहे, ही एकच अट या योजनेत असणार आहे.

तसेच, धनदांडग्यांच्या ‘हिट अ‍ॅण्ड रन’ प्रकरणात एखाद्या निरपराधाचा मृत्यू झाल्यास मृताच्या कुटुंबाला 2 लाख रूपये मिळतील, अशी घोषणाही गडकरी यांनी केली आहे. राज्यांच्या परिवहन मंत्र्यांसोबत प्रगती मैदानात ( भारत मंडपम ) झालेल्या बैठकीनंतर गडकरींनी रस्ता सुरक्षा, जुनी वाहने स्क्रॅप करणे आणि भारताच्या ऑटोमोबाइल उद्योगाच्या विकासाबाबत माहिती दिली.

हेही वाचा : ठाकरे अन् ‘मविआ’ला मोठा धक्का, राज्यपाल नामनिर्देशित 12 आमदारांची याचिका कोर्टानं फेटाळली

नितीन गडकरी म्हणाले, “2024 मध्ये रस्ते अपघातात किमान 1 लाख 80 हजार लोकांनी आपला जीव गमावला. यापैकी 30 हजार लोकांनी मृत्यू हेल्मेट न घातल्यानं झाला आहे. आणखी एक गंभीर बाब म्हणजे यातील 66 टक्के मृत हे 18 ते 34 वयोगटातील आहेत.”

“ड्रायव्हिंग लायसन्स नसलेल्या लोकांमुळे झालेल्या अपघातांत जवळपास तीन हजार जणांचा मृत्यू झाला आहे. आमच्या बैठकीचा महत्त्वाचा मुद्दा ड्रायव्हिंग प्रशिक्षण केंद्र होता. आपल्या देशात सध्याच्या घडीला तब्बल 22 लाख वाहन चालकांची कमतरता आहे. मात्र, आम्ही धोरण बनवले आहे,” अशी माहिती गडकरींनी दिली आहे.

“चार महिन्यांपूर्वी जपानला मागे टाकत भारत वाहन उद्योग क्षेत्रात जगातील तिसरा मोठा देश बनला आहे. देशाच्या वाहन उद्योग क्षेत्राची उलाढाल आता 22 लाख कोटींवर पोहोचली आहे,” असंही गडकरींनी म्हटलं.

हेही वाचा : खंडणी, ईडी अन् वाल्मिक कराड; सुप्रिया सुळेंकडून मोदी, फडणवीस सरकारला प्रश्नांची सरबत्ती