Homeदेश-विदेशNitin Gadkari : केंद्र सरकार म्हणते शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार, पण नितीन...

Nitin Gadkari : केंद्र सरकार म्हणते शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार, पण नितीन गडकरी म्हणतात…

Subscribe

बेरोजगारी आणि गरिबीमुळे ग्रामीण भागातून शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांचे लोंढे येत आहेत. म्हणूनच आज आपल्याला दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नई आणि बंगळुरू यासारख्या महानगरांमधील समस्या वाढत असल्याचे दिसत आहे, असे नितीन गडकरी म्हणाले.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साधारणपणे नऊ वर्षांपूर्वी शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, अद्याप तशी परिस्थिती निर्माण झालेली नाही. त्यातच ग्रामीण भागातून होणारे स्थलांतरही केंद्र सरकारला रोखता आलेले नाही. ते रोखण्यासाठी सरकारने यंदाच्या अर्थसंकल्पात नव्या योजनेची घोषणा करावी लागली. तर दुसरीकडे, शहराच्या दिशेने मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या स्थलांतराबाबत चिंता व्यक्त करतानाच, कृषीमालाला योग्य भाव मिळत नसल्याकडे केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी लक्ष वेधले आहे. (Nitin Gadkari : Farmers are not getting fair price for agricultural produce)

गरिबी आणि बेरोजगारीमुळे ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने लोक दिल्ली, मुंबई आणि बंगळुरूसारख्या महानगरांमध्ये स्थलांतरित होत आहेत. आपल्या शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याने हे स्थलांतर होत असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी एका कार्यक्रमात सांगितले.

हेही वाचा – Delhi Election 2025 : बारकाईने लक्ष ठेवा, आदित्य ठाकरे यांचे आप आणि काँग्रेसला आवाहन

बेरोजगारी आणि गरिबीमुळे ग्रामीण भागातून शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांचे लोंढे येत आहेत. म्हणूनच आज आपल्याला दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नई आणि बंगळुरू यासारख्या महानगरांमधील समस्या वाढत असल्याचे दिसत आहे, असे सांगून ते म्हणाले की, भारतात फ्लेक्स इंजिन असलेली वाहने येत आहेत आणि देशात इथेनॉल पंप उघडले जात आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल. हे असे क्षेत्र आहे जिथे आपण शेतीला पाठबळ देऊ शकतो… पूर्वी आपण शेतकऱ्यांना ‘अन्नदाता’ म्हणत असू, परंतु आमच्या सरकारने शेतकऱ्यांना ‘ऊर्जादाता’देखील बनवले आहे.

हायड्रोजन हे भविष्यातील इंधन असून आमचे स्वप्न हायड्रोजन इंधनाचे निर्यातदार बनण्याचे असल्याचे गडकरी यांनी सांगितले.

प्रधानमंत्री धन-धान्य योजना

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शनिवारी लोकसभेत अर्थसंकल्प मांडला. त्यावेळी ‘प्रधानमंत्री धन-धान्य योजने’अंतर्गत 100 जिल्ह्यांचा समावेश केला जाणार असल्याची घोषण त्यांनी केली. या योजनेचा 1.7 कोटी शेतकऱ्यांना थेट लाभ मिळणार आहे, ज्यामुळे कृषी क्षेत्राला मोठी चालना मिळेल. ही योजना विशेषतः तरुण आणि महिलांवर लक्ष केंद्रित करणार आहे. तरुणांना आणि महिलांना आपल्या गावातच रोजगार मिळू शकेल आणि स्थलांतर थांबवता येईल, असे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट असणार आहे. या योजनेत राज्य सरकारांशी भागीदारी करून कमी उत्पादनक्षम असलेल्या जिल्ह्यांमध्ये कृषी सुधारणा केली जाणार आहे. (Nitin Gadkari : Farmers are not getting fair price for agricultural produce)

हेही वाचा – Anjali Damania: धनंजय मुंडेंचा कृषी खात्यात 275 कोटींचा घोटाळा; भगवान गडानेच आता राजीनामा मागावा